Next
‘टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५’ने ओलांडला एक लाखाचा टप्पा
प्रेस रिलीज
Wednesday, September 19, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this story

होसुर : टीव्हीएस मोटर कंपनीने ‘टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५’ या १२५ सीसी स्कूटरच्या एक लाख विक्रीचा टप्पा ओलांडला असल्याचे जाहीर केले आहे. या ब्रँडने आगामी सणासुदीच्या निमित्ताने मेटॅलिक रेड कलर हा नवा रंगही सादर केला आहे.

फेब्रुवारी २०१८मध्ये दाखल करण्यात आलेली ‘टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५’ ही टीव्हीएसच्या रेसिंग परंपरेवर आधारित आहे. प्रामुख्याने तरुणांसाठी तयार केलेल्या या स्कूटरमध्ये टीव्हीएस स्मार्टएक्सनेक्ट या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने ती भारतातील पहिली कनेक्टेड स्कूटर ठरली आहे. दाखल झाल्यापासून सहा महिन्यांमध्ये या स्कूटरला ग्राहकांकडून प्रचंड मागणी असून, वेबसाइटवर २२ लाख व्हिजिट आहेत.

या विषयी बोलताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे कम्युटर मोटरसायकल्स, स्कूटर्स व कॉर्पोरेट ब्रँडचे उपाध्यक्ष (मार्केटिंग) अनिरुद्ध हलदर म्हणाले, ‘टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५ ही आमची पहिली १२५ सीसी स्कूटर असून, ती भारतातील पहिली ब्लु-टूथ कनेक्टेड स्कूटर आहे. आमचे मुख्य लक्ष्य असलेल्या युवा वर्गाने या नव्या उत्पादनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एखाद्या ब्रँडला इतक्या प्रमाणात पसंती मिळणे उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करम्यासाठी आमचा उत्साह दुप्पट झाला आहे.’

स्कूटरने टीव्हीएस स्मार्टएक्सनेक्ट हे नाविन्यपूर्ण ब्लु-टूथ एनेबल्ड तंत्रज्ञान सादर केले असून, ते विशेष एनटीओआरक्यू मोबाइल अॅपशी जोडले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकते. टीव्हीएस स्मार्टएक्सनेक्टमुळे, ५५ वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या पूर्णतः डिजिटल स्पीडोमीटरमध्ये या श्रेणीतील पहिलीवहिली वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.

एअरक्राफ्टच्या डिझाइनपासून प्रेरणा घेत, ‘टीव्हीएस एनटीआरओक्यू १२५’मध्ये ठळक, आक्रमक स्टाइल साकारण्यात आली असून, सिग्नेचर टेल व एलईडी टेललॅम्पचा समावेश करण्यात आला आहे. ही स्कूटर मॅट यलो, मॅट ग्रीन, मॅट रेड व मॅट व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. एप्रिल २०१८मध्ये, ब्रँडने मेटॅलिक सीरिज दाखल केली असून, त्यामध्ये मेटॅलिक ब्ल्यू, मेटॅलिक ग्रे व नव्याने दाखल झालेल्या मेटॅलिक रेडचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link