Next
‘यमलेन’ची ‘ऑफिस’सह भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, September 20 | 04:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘यमलेन’ या भारताच्या पहिल्या ताज्या पॅक केलेल्या एफएमसीजी फूड ब्रॅंडने ‘ऑफिस’ या भारतातील सर्वात मोठ्या को-वर्किंग स्पेस प्रदात्याशी भागीदारी केली आहे आणि आपला प्रारंभिक हीट अँड ईट पिझ्झा सादर केला आहे. मुंबई आणि पुणे येथे आपल्या १० खास केंद्रांमध्ये ताज्या पॅक केलेल्या पिझ्झाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, या भागीदारीमार्फत ‘यमलेन’ खूप मोठ्या स्तरावर विस्तार करणार आहे.

देशातील नऊ मोठ्या शहरांत ५५ को-वर्किंग केंद्रांमध्ये एकूण २५ हजारांपेक्षा जास्त जागांचे ऑफिसचे नेटवर्क आहे. या भागीदारीद्वारे काम करणाऱ्या लोकांची काम करता करता पिझ्झा आणि पोटभर नाश्ता करण्याची आवड पूर्ण करून त्यांचा दैनंदिन काम करण्याचा अनुभव अधिक सुंदर करणे हा ‘ऑफिस’ आणि ‘यमलेन’ यांचा उद्देश आहे. शिवाय आपला विस्तार वेगाने वाढवण्यासाठी आणखी को-वर्किंग पॉइंट ऑफ सेल घेण्याची ‘यमलेन’ची योजना आहे.

‘यमलेन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश आहुजा म्हणाले, ‘ऑफिस ब्रॅंडशी हातमिळवणी करताना आम्ही उत्साहित आहोत कारण या ब्रॅंडची गतीशीलता आणि ऊर्जा यमलेनशी मिळतीजुळती आहे. को-वर्किंग स्पेसची मार्केट ४० टक्के दराने वाढत आहे आणि २०२० पर्यंत या अंतर्गत १३ दशलक्ष जागा असतील. आमच्या उत्पादनांसाठी या क्षेत्रात आम्हाला खूप शक्यता दिसत आहेत. आमच्या हे लक्षात आले आहे की आमची उत्पादने विशेषतः अशा कर्मचारी वर्गाला आवडतात, ज्यांना काम करता करता झटपट आणि चविष्ट खाद्यपदार्थ हवे असतात.’

स्थापना झाल्यापासून ‘यमलेन’ने भारतीयांच्या खाण्याच्या सवयींमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आहे. ताजे पॅक केलेले, स्वच्छ स्नॅक्स सादर करून देशातील अव्यवस्थित स्नॅकिंग क्षेत्रास सुव्यवस्थित करण्याचे या ब्रॅंडचे उद्दीष्ट आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link