Next
गुस्ताव्ह फ्लोबेर, डॉ. अमृत भालेराव
BOI
Tuesday, December 12 | 04:00 AM
15 0 0
Share this story

अनेक प्रेमप्रकरणं करून शेवटी एखाद्या वेश्येसारखी परवड होणाऱ्या मादाम बोव्हरीची प्रक्षोभक कथा १८५७ साली लिहून खळबळ उडवणारा फ्रेंच लेखक गुस्ताव्ह फ्लोबेर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अमृत भालेराव यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
................
गुस्ताव्ह फ्लोबेर 

१२ डिसेंबर १८२१ रोजी ऱ्हूआमध्ये जन्मलेला फ्लोबेर हा अतिशय महत्त्वाचा फ्रेंच साहित्यिक. त्या वेळच्या फ्रान्समधल्या बूर्झ्वा समाजाचं यथार्थ चित्रण करणारा हा प्रसिद्ध लेखक.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्याचं लिखाण प्रसिद्ध व्हायला लागलं होतं. त्याचे वडील प्रख्यात सर्जन, तर आई डॉक्टरची मुलगी. त्यामुळे आसपास वैद्यकीय वातावरण होतं आणि त्याचा प्रभाव त्याच्यावर पडला होता. तो बूर्झ्वा, पांढरपेशा मंडळींचा तिरस्कार करायचा. 

१८५७ साली त्याची ‘मादाम बोव्हरी’ ही जगप्रसिद्ध कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने जगभर खळबळ माजवली. विवाहबाह्य संबंधांवर आधारित या कादंबरीतल्या वर्णनांनी त्या काळी त्याच्यावर चांगलीच टीकाही झाली. चार्ल्स बोव्हरी या बोअरिंग डॉक्टरची बायको एम्मा बोव्हरी ही आपल्या नीरस आयुष्यात विरंगुळा म्हणून कादंबऱ्यांच्या जगतात स्वतःला हरवते आणि मग त्यातल्याच फॅन्टसी प्रत्यक्ष आयुष्यात जगताना तिची प्रेमप्रकरणं घडत जातात आणि शेवटी एखाद्या वेश्येसारखी तिच्या आयुष्याची परवड होते. आणि शेवटी ती विष पिऊन आत्महत्या करते. हा विषय १८५७ साली चांगलाच प्रक्षोभक ठरला होता. 

सालाम्बो, दी टेम्प्टेशन ऑफ सेंट अॅन्थनी, मेम्वॉर ऑफ ए मॅडमॅन, थ्री टेल्स, सेन्टिमेंटल एज्युकेशन अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

आठ मे १८८० रोजी त्याचा ख्ख्वास्सेमध्ये मृत्यू झाला.
...............

अमृत नारायण भालेराव
१२ डिसेंबर १९०२ रोजी जन्मलेले डॉ. अमृत नारायण भालेराव हे मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. 

रंगभूमीसाठी महत्त्वाचं योगदान देत असतानाच त्यांनी साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक प्रेरणादायी कार्य केलेलं आहे. त्यांनी १९३४ साली ‘बॉम्बे क्रिकेटर्स’ची स्थापना केली होती. 

‘अरविंद’ मासिकाचे ते संपादक होते. 

२५ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link