Next
डॉ. आगाशे, डॉ. लुकतुके, डॉ. वाटवे यांच्याशी गप्पा
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 05:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : ठाण्यातील इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) आणि अमरावती येथील प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था संचालित पुण्यातील सिग्मंड फ्रॉईड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अॅनॅलिसिस इन्स्टीट्यूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मनोविकारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ  डॉ. उल्हास लुकतुके व  मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे या त्रिकूटाशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
‘मानसिक आरोग्य : ५० वर्षाचा एक प्रवास’ या विषयावर प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी हे या तिघांशी गप्पा मारणार आहेत. येत्या रविवारी,१८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे हा गप्पांचा आगळावेगळा कार्यक्रम रंगणार आहे,’ अशी माहिती सिग्मंड फ्रॉईड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अॅनॅलिसिस इन्स्टिट्यूटचे संस्थापक- संचालक राजेश अलोणे यांनी दिली.

संस्थेच्या सहसंचालिका प्रसन्ना अलोणे म्हणाल्या, ‘पुण्यासह राज्याच्या विविध भागातील मानसशास्त्र आणि मनोविकारशास्त्राचे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्र समुपदेशक, मानसतज्ज्ञ आणि संबंधित विषयांचा सराव करणारे व्यवसायिक, मानसशास्त्राची आवड आणि मनोस्वास्थ संवर्धन करण्यास इछुक असणारे सामान्य व्यक्तीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. मानसशास्त्र आणि मनोविकारशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तसेच व्यवसायिकांना गेल्या ५० वर्षात मानसिक आरोग्यात काय स्थित्यंतरे आणि बदल होत गेले, याविषयी; तसेच यापुढे आपण यात कसे भरीव योगदान करू शकतो, याचे मार्गदर्शन या मुलाखतीतून होणार आहे. सर्वसामान्य व्यक्तींना मनोस्वास्थ संवर्धनाचे मार्गदर्शन व्हावे, हाही या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.’

‘कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी ८००७८६२९८२, ९२२६९५८८८८,९६७३१०९९६६,९९२२७२०११४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समन्वयक शिल्पा तांबे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाविषयी 
‘मानसिक आरोग्य : ५० वर्षाचा एक प्रवास’ या विषयावर गप्पा
ठिकाण : बालगंधर्व रंगमंदिर 
वेळ : रविवारी,१८ फेब्रुवारी, सायंकाळी ६ ते ९ 
पूर्वनोंदणीसाठी : शिल्पा तांबे : ८००७८ ६२९८२, ९२२६९ ५८८८८,
                          ९६७३१ ०९९६६,९९२२७ २०११४ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link