Next
‘लर्निंग पॉइंट’तर्फे उन्हाळी सुट्टीत निवासी शिबिर
रत्नागिरी आणि पुण्यातील मुलांना सहभागी होता येणार
BOI
Monday, March 18, 2019 | 12:01 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील लर्निंग पॉइंटतर्फे पुणे आणि रत्नागिरीतील मुलांसाठी या वर्षी प्रथमच उन्हाळी सुट्टीत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाचवी ते आठवीतील मुलांसाठी १९ ते २१ एप्रिल २०१९ या कालावधीत रत्नागिरीत हे निवासी शिबिर घेण्यात येणार आहे.

आता वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू आहे. लवकरच उन्हाळी सुट्ट्या पडणार असल्याने या सुट्टीत काय करायचे हा यक्ष प्रश्न नेहमीच पालकांना सतावत असतो. मुलांच्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने अनेक पालक मुलांच्या वेळेचे नियोजन करत असतात. यासाठीच लर्निंग पॉईंटतर्फे प्रथमच पुण्यातील व रत्नागिरीतील मुलांसाठी रत्नागिरीमध्ये निवासी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

मागील १५ वर्षांपासून रत्नागिरीमध्ये लर्निंग पॉइंटच्या माध्यमातून सुट्टीतील शिबिर आयोजित केली जात आहेत. या शिबिरांना दर वर्षी पालक आणि मुलांचा उदंड प्रतिसाद मिळतो. सुट्टीतील शिबिराव्यतिरिक्त विविध उपक्रम  लर्निंग पॉइंटतर्फे राबविले जात आहेत. यात अॅक्टिव्हिटी सेंटर, टीनेज क्लब, डे केअर सेंटर, विविध वयोगटांतील मुलांची मानसशास्त्रीय तपासणी व समुपदेशन, पालक व व्यावसायिकांसाठी कार्यशाळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या सेवांचा लाभ घेतला आहे.

दर वर्षी मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच या वर्षी प्रथमच १९, २० व २१ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत पुण्यातील व जवळपासच्या परिसरातील विद्यार्थी व रत्नागिरीतील  विद्यार्थी यांचे एकत्रित निवासी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात मुलांसाठी धाडसी खेळ (व्हॅली क्रॉसिंग, केव्हिंग), रत्नागिरी दर्शन (शहरी भाग), मैदानी खेळ, मानसशास्त्रीय तत्त्वांवर आधारित खेळ, क्राफ्ट, चित्रकला व मधुबनी, फिल्ड व्हिजिट, आउटिंग, गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण व मॅजिक गार्डन या अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. हे शिबिर सशुल्क असून, प्रवेश मर्यादित आहेत. यात पुणे-रत्नागिरी-पुणे बस प्रवास, तसेच शिबिरातील सर्व खर्च समाविष्ट करण्यात आले आहेत.  

एक वेगळाच आनंद देणाऱ्या या शिबिरात मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन लर्निंग पॉइंटचे संचालक व मानसशास्त्रज्ञ सचिन सारोळकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सचिन सारोळकर : ९४२२४ २९८९९
सुखदा सारोळकर : ९९७५४ २४८५७.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search