Next
‘मर्सिडीज-बेन्‍झ’ने भारतात सादर केली लाखावी कार
प्रेस रिलीज
Monday, May 28 | 12:48 PM
15 0 0
Share this storyपुणे : भारताची सर्वात मोठी लक्‍झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेन्‍झने भारतीय बाजारपेठेसाठी ई-क्‍लासमधील एक लाखावी मर्सिडीज-बेन्‍झ कार सादर करत ऐतिहासिक टप्‍पा गाठला. चाकण येथील मर्सिडीज-बेन्‍झच्‍या जागतिक दर्जाच्‍या उत्‍पादन केंद्रामध्‍ये मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोलंड फोल्‍गर आणि मर्सिडीज-बेन्‍झ इंडियामधील कार्यसंचालनांचे कार्यकारी संचालक पियुष अरोरा यांच्‍या हस्‍ते कारचे अनावरण करण्‍यात आले.

या ऐतिहासिक क्षणाबाबत बोलताना रोलँड फॉल्जर म्‍हणाले, ‘भारतात मर्सिडीज-बेन्‍झच्‍या एक लाखाव्‍या व्हेइकलचे सादरीकरण हे ग्राहकांचा विश्‍वास आणि या गतिशील देशामध्‍ये मर्सिडीज-बेन्‍झ ब्रॅंडला मिळत असलेल्‍या प्रतिसादाला दाखवते. २४ वर्षांपूर्वी आम्‍ही देशात लक्‍झरी कारची सुविधा देण्‍याचा सुरू केलेला प्रवास अधिकाधिक लाभदायी बनला आहे. आज आम्‍ही देशातील सर्वात विश्‍वसनीय लक्‍झरी ब्रॅंड बनलो आहोत. एक लाख कार्स सादर करण्‍याचा हा टप्‍पाही देखील मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाच्या गतकाळातील व विद्यमान कर्मचाऱ्यांनी घेतलेल्‍या मेहनतीचे प्रतीक आहे. हे कर्मचारी सदैव आमचे सर्वोत्तम ब्रॅंड अॅम्‍बेसेडर्स राहतील. हे यश मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाच्‍या कटिबद्धतेलाही दर्शवते. भारतातील ही गाथा व त्यातील क्षमतांवर आमचा प्रबळ विश्‍वास आहे. आम्‍ही भारतीय ग्राहकांसोबतचे आमचे नाते अधिक दृढ करू आणि त्‍यांना सतत आमची उत्‍पादने व ग्राहकसेवा देत राहू.’

‘आम्‍हाला खात्री आहे की मर्सिडीज-बेन्‍झ उत्‍पादनांची वाढती मागणी, तरुण यशस्‍वी भारतीयांमधील आकांक्षा, आमचे व्‍यापक व विकसित होत असलेले स्‍थानिक पोर्टफोलिओ, अतुलनीय नेटवर्क आणि ग्राहकसेवेमधील नाविन्‍यतेसह उत्‍पादनाचा पुढील यशस्‍वी टप्‍पा लवकरच गाठण्‍यात येईल. आम्‍ही भारतात लक्‍झरी मोटरिंगमध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. आमचा ‘ग्राहक आनंद’ दृष्टिकोन आणि भावी व्हिजनसह आम्‍हाला भारतात भावी मोबिलिटी निर्माण करण्‍याचा विश्‍वास आहे,’ असे फॉल्जर यांनी सांगितले.

मर्सिडीज-बेन्‍झ इंडियामधील कार्यसंचालनांचे कार्यकारी संचालक पियुष अरोरा म्‍हणाले, ‘मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाचे उत्‍पादन केंद्र हे उत्‍पादनामधील दर्जा व प्रगत तंत्रज्ञानामधील जागतिक केंद्र आहे. हे केंद्र भारतातील आमच्‍या विकासाचे आधारस्‍तंभ राहिले आहे. रिफाइन्‍मेंटची उच्‍च पातळी आणि प्रगत तंत्रज्ञान व स्थिर प्रक्रियांची अंमलबजावणी मर्सिडीज-बेन्‍झची उत्‍पादने जागतिक दर्जाची असल्‍याची खात्री देते आणि भारतातील लक्‍झरी कार क्षेत्रासाठी उत्‍पादनामधील नवीन बेंचमार्क निर्माण करते. एक लाखाव्‍या कारच्‍या सादरीकरणासह आम्‍ही आमची ‘मेक इन इंडिया, फॉर इंडिया’ कटिबद्धता अधिक प्रबळ करतो. आम्‍ही आमच्‍या स्‍थानिक सुविधेमध्‍ये अधिक भर करू आणि भारतातील आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना सर्वोत्तम जागतिक दर्जाची उत्‍पादने उपलब्‍ध करून देऊ. आम्‍ही उत्‍पादनामधील भावी मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासोबतच बाजारपेठेमधील आवश्‍यकतांनुसार भावी तंत्रज्ञानांचा अवलंब करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहोत.’

१३० वर्षांहून अधिक काळाचा वारसा आणि भारतातील लक्षवेधी इतिहासासह मर्सिडीज-बेन्‍झ देशाच्‍या ऑटोमोटिव्‍ह क्षेत्राचा एक भाग बनली आहे. मर्सिडीज-बेन्‍झ हा १९९४ मध्‍ये भारतीय बाजारपेठेमध्‍ये प्रवेश करणारा पहिला लक्‍झरी ऑटोमोटिव्‍ह ब्रॅंड होता. डब्‍ल्‍यू १२४ ई-क्‍लास ही भारताच्‍या आधुनिक काळातील पहिली लक्‍झरी कार होती. ही कार पुण्‍यातील पिंपरी येथील मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाच्‍या असेम्‍ब्‍ली केंद्रामध्‍ये सादर करण्‍यात आली. तेव्‍हापासून मर्सिडीज-बेन्‍झ इंडिया देशातील ऑटोमोटिव्‍ह लक्‍झरीच्‍या संपूर्ण व्‍यवसायामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे.

मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाने पुण्‍याजवळील चाकण येथे उत्‍पादन केंद्र सुरू केली आहे. यासाठी कंपनीने एक हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली. हे केंद्र १०० एकरहून अधिक जागेवर विस्‍तृत पसरलेले असून, मर्सिडीज-बेन्‍झच्‍या ग्‍लोबल प्रॉडक्‍शन नेटवर्कचा भाग आहे. ब्राझील, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड व व्हिएतनाममधील सीकेडी/एमव्‍हीपी उत्‍पादन नेटवर्कमध्‍ये मर्सिडीज-बेन्‍झ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावते. या ठिकाणी मर्सिडीज-बेन्‍झ स्‍थानिक बाजारपेठांसाठी विविध स्‍तरांमध्‍ये व्हेइकल्‍सचे निर्माण करते. याच परिसरात सुरू करण्यात आलेल्या नवीन विस्तारित उत्पादन केंद्रातही जून २०१५ पासून उत्पादन सुरू झाले आहे. गतिशील बाजारपेठेला अधिक सुविधा म्‍हणून मर्सिडीज-बेन्‍झ ही सर्वात मोठे स्‍पेअर पार्ट्सचे वेअरहाउस असलेली भारतातील लक्‍झरी कार निर्माता कंपनी आहे. या वेअरहाऊसमध्‍ये ४४ हजार पार्ट्सचा स्‍टॉक मावू शकतो.

चाकण येथील मर्सिडीज-बेन्‍झच्‍या जागतिक दर्जाच्‍या उत्‍पादन केंद्रामध्‍ये ई-क्‍लासमधील एक लाखाव्या कारचे अनावरण करताना मर्सिडीज-बेन्‍झ इंडियाच्या कार्यसंचालनांचे कार्यकारी संचालक पियुष अरोरा (डावीकडे) आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोलंड फोल्‍गर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link