Next
करंजेटेप-कासू येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, February 07, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this story

अलिबाग : नवयुवक मित्र मंडळातर्फे दर वर्षीप्रमाणे याहि वर्षी करंजेटेप-कासू येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे हे आठवे वर्ष असून, यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. यात कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलकडून आरोग्य तपासणी केली जाणार असून, हे शिबिर आठ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहील.

त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा, भजन, हरिपाठ, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा आणि शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम तांडेल, नवयुवक मित्र मंडळाचे संस्थापक विनय तांडेल, शांताराम तांडेल यांसह मंडळाचे सभासद व श्रीलक्ष्मी महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link