Next
ट्रान्स्फॉर्म लाइफ
BOI
Wednesday, October 24 | 10:07 AM
15 0 0
Share this story

‘तुमच्या आयुष्यात बदल घडविण्याची ताकद एका विचारात असते,’ हा सोपा, पण अंमलात आणण्यास कठीण असणारा विचार डॉ. विजय देशमुख यांनी ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या पुस्तकातून सांगितला आहे. ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’मधून आपणच आपले आयुष्य कसे चांगले घडवू शकतो, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. यासाठी ध्यानधारणा, योग, सकारात्मक विचार, आधुनिक शास्त्रीय माहितीचा आधार त्यांनी घेतला आहे. ध्येय निश्चित केल्यावर केवळ विचार न करता त्यासाठी कृती करणेही महत्त्वाचे असते. यासाठी शिस्तशीर जीवनक्रम पाळण्याचा आग्रह ठेवला पाहिजे. गुरूचे मार्गदर्शन, तसेच अडथळ्यांना धैर्याने सामोरे गेल्यास यश दृष्टिपथात दिसते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठीची आंतरिक इच्छा असणे, चांगल्या गोष्टींची वहीत नोंद करणे, अंतिम स्थानी पोहोचल्यावर थांबायला शिकणे, वेळेचे नीट नियोजन करणे, ध्येयासाठी प्रार्थनेतून बळ मिळविणे, धावपळीच्या आयुष्यात पैशामागे धावताना जगायचे विसरून न जाता छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे अशा ४०हून अधिक विचारांतून आयुष्यात परिवर्तन घडविण्याचा मार्ग या पुस्तकात दाखविला आहे. याचा मराठी अनुवाद प्रा. श्यामला कुलकर्णी यांनी केला आहे.

पुस्तक : ट्रान्स्फॉर्म लाइफ
लेखक : डॉ. विजय देशमुख
अनुवादक : प्रा. श्यामला कुलकर्णी
प्रकाशन : व्हीएलडी वेलनेस
पृष्ठे : १६१
मूल्य : २४९

(‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link