Next
हरित वारी सायकल रॅलीतून पर्यावरण रक्षणाचा जागर
BOI
Monday, July 01, 2019 | 11:11 AM
15 0 0
Share this article:सोलापूर :
सोलापुरात २९ जून रोजी हरित वारी सायकल रॅली काढण्यात आली. वारी परिवार सायकल क्लबने ही रॅली आयोजित केली होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व फिनोलेक्स पाइप इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यातून ती काढण्यात आली. श्री संत दामाजीपंतांच्या पुतळ्यास पुष्पहार, सायकलीचे व वडाच्या झाडाचे पूजन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, फिनोलेक्स कंपनीचे सेल्स मॅनेजर संजय आळीकट्टे, गोपाळ आदोने, प्रदीप देशमुख आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मंगळवेढा ते पंढरपूर या हरित पालखी महामार्गावर वृक्ष लागवड व संवर्धनाच्या जागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली. शरदनगर, मल्लेवाडी, ढेकळेवाडी, सिद्धेवाडी, एकलासपूर, अनवली, गोपाळपूर व पंढरपूर शहरात पत्रके वाटून जनप्रबोधन करण्यात आले. प्लास्टिक हटवा देश नटवा, झाडे लावा झाडे जगवा, वारीत स्वच्छता करू या निर्मल वारी घडवू या, दारू ढोसाल तर मरून बसाल, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, मुली वाचवा देश वाचवा, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. 

प्रत्येक सायकलस्वाराचे एकात्मता दाखविणारे टी-शर्ट व विविध विषयावरील सामाजिक संदेश देणारे सायकलीवर लावलेले बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सुधाकरपंत परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी पंढरपुरात रॅलीचे स्वागत केले. संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम भवन येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.या प्रसंगी हरित वारीचे प्रणेते ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुरणवाड, संजय आळीकट्टे, गोपाळ आदोने, प्रदीप देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते सहभागी सायकलस्वारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे यांना वृक्षमाता पद्मश्री थिमक्का राष्ट्रीय हरित पुरस्कार मिळाल्याबद्दल संत तुकारामांची मूर्ती व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सायकल रॅलीसाठी पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, सोलापूरची फिनोलेक्स पाइप इंडस्ट्रीज, मंगळवेढा पोलीस स्टेशन, साई मॅटनिर्टी होम, डॉ. युवराज पवार यांचे सहकार्य लाभले. यात १२५ तरुणांनी सहभाग नोंदविला. 

प्रास्ताविक दत्तात्रय बागल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले, तर आभार संजय आळीकट्टे यांनी मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search