Next
‘चेंजमेकर’ ठरलेल्या महिलांचा सन्मान
गंगा धेंडे ‘परिवर्तनाचे दूत’ पुरस्काराच्या मानकरी
BOI
Tuesday, March 12, 2019 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

‘चेंजमेकर्स’ उपक्रमाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी सनत परमार, दर्शना परमार, चेतन तुपे, रुपाली चाकणकर, वैशाली बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : स्फूर्ती महिला मंडळ आणि ‘स्माईल’ संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ (परिवर्तनाचे दूत) उपक्रमाअंतर्गत पद्मा कांबळे गटातील चेंजमेकर प्रमोटर गंगा धेंडे यांनी ‘परिवर्तनाचे दूत’ पुरस्कार पटकावला. रुपाली पानसरे यांना ‘उद्योगिनी’, रत्ना नाईक यांना ‘विकासिनी’, सोनाली गाडे यांना ‘स्वयंसिध्दा’, ऊर्मिला गायकवाड यांना ‘शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय वर्षा कुंभार यांना ‘स्वावलंबन’, अनुराधा काळसेकर यांना ‘कलावंती’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. शीतल कुंभार पुरस्कृत चार सेवा पुरस्कार जयश्री घाडगे, स्वप्नाली हुन्नूर, सुजाता झुरंगे, प्रणिती आंगरे यांना देण्यात आले. मृणालिनी वाणी यांना ‘विशेष सहभाग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

टिळक स्मारक मंदिर येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी सनत परमार, दर्शना परमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रुपाली चाकणकर, अश्विनी कदम, वैशाली बनकर, लक्ष्मी दुधाने, नंदा लोणकर, विजया कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, चेंजमेकर्स ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या. 

या वेळी वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘चेंजमेकर’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू झाला. समाजात अनेक समस्या, आव्हाने आहेत. समाजासाठी आणि शहरासाठी आपण देणे लागतो, त्यासाठी झटून काम केले पाहिजे. या उपक्रमात स्वच्छता, साक्षरता मोहीम, तसेच अनेकविध उपक्रमांचे आयोजन होते. महिलांना सक्षम, सबल करायचे असेल, तर पहिले त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या, तर खऱ्या अर्थाने समाजाला घडवू शकतील. या उपक्रमामुळे महिलांचे कुटुंबातील स्थान उंचावले आहे. महिलांमधील आत्मविश्वास वाढावा यासाठी विविध उपक्रम ‘चेंजमेकर’ घेते.’ 

या वेळी सर्व चेंजमेकर प्रमोटर्सना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मृणालिनी वाणी, शीतल कुंभार, रत्ना नाईक,अनुराधा काळसेकर, सोनाली गाडे, उर्मिला गायकवाड, पद्मा कांबळे यांचा समावेश होता. 

पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर तृतीयपंथीय ऋषीका शर्मा हिने दिग्दर्शित केलेला ‘रॅम्प वॉक’ विशेष आकर्षण ठरला. ‘कजरा मोहोब्बतवाला’ हा मानिनी गुर्जर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून दाद दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search