Next
‘जेट एअरवेज’तर्फे पुण्यासाठी नवीन २६ विमानसेवा
प्रेस रिलीज
Thursday, March 15 | 06:00 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘जेट एअरवेज’ने या उन्हाळ्यापासून पुणे ते चंडीगड, पाटणा आणि रायपूर अशा नवीन २६ साप्ताहिक विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.  यामध्ये काही थेट विनाथांबा विमानसेवा; तसेच काही शहरांसाठी पहिल्यांदाच विमानसेवा सुरू केली जाणार आहे. काही नवीन शहरांसाठी एक थांबा असलेल्या सेवादेखील सुरू करण्यात येणार आहेत.
 
नवीन वेळापत्रकानुसार ‘जेट एअरवेज’तर्फे पहिल्यांदाच पुणे शहराचा पाटणा आणि रायपूर शहरांबरोबर विनाथांबा हवाईसंपर्क साधला जाणार आहे. त्याखेरीज पुणे-चंडीगड अशी तसेच परतीची विमानसेवाही सुरू होणार आहे. आठवड्यातून तीनदा गुवाहाटीमार्गे इंफाळ, मणीपूर ही थेट सेवा राहील.
 
पुणे- चंडीगड, पुणे -पाटणा  ही विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस असून दर रविवारी पुणे-रायपूर ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे.  या नवीन विमानसेवेचा लाभ विद्यार्थी, उद्योजक, पर्यटकांना होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील व्यवसाय वाढणार असून पर्यटनाचा विकास होणार आहे.
 
नवी दिल्ली ते उत्तर-पूर्व भागातील काही महत्त्वाच्या शहरांबरोबर हवाईसंपर्क साधला जाणार आहे. त्यामध्ये नवी दिल्लीहून ऐजवाल आणि जोरहाट या शहरांबरोबर आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू केली जाणार आहेत. नवी दिल्ली-सिल्चर ही विमानसेवा आठवड्यातून चार वेळा सुरू होणार आहे. त्याखेरीज या विमानसेवेद्वारे नवी दिल्ली-इम्फाळ अशी थेट विमानसेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असेल.   तिरुचरापल्ली- मुंबई, तिरुचरापल्ली-नवी दिल्ली या दैनंदिन थेट विमानसेवा सुरू होणार आहेत. मुंबई आणि बंगळुरू ही दोन शहरे अमृतसर शहराशी पहिल्यांदाच थेट विमानसेवेद्वारे जोडली जातील. बंगळुरू इंदूर आणि पाटणा शहरांबरोबरही जोडले जाईल. 

 ‘जेट एअरवेज’चे नेटवर्क नियोजन आणि महसूल व्यवस्थापनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज सिवाकुमार म्हणाले, ‘सध्या देशभरातून विमानसेवेची मागणी होत असून प्रवासी विविध ठिकाणांची मागणी करीत आहेत. विमानप्रवाशांकडून कमीतकमी थांबे असलेल्या मार्गांची मागणी होत आहे. त्यामुळे आमच्या नवीन उन्हाळी वेळापत्रकामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या विमानसेवांमध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि बंगुळुरूबरोबरच इतर काही महत्त्वाच्या शहरांशी थेट, विनाथांबा हवाईसंपर्क साधला जाणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link