Next
‘रोबोकॉन’मध्ये निरमा युनिव्हर्सिटीला विजेतेपद
प्रेस रिलीज
Monday, March 05 | 05:23 PM
15 0 0
Share this story


पुणे :  दूरदर्शन व एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरींग, आळंदी यांच्यातर्फे आयोजित ‘एबीयू राष्ट्रीय रोबोकॉन’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी निरमा युनिव्हर्सिटी’ने विजेतेपद मिळविले. ‘एमआयटी, पुणे’ ने दुसरे स्थान व ‘के.जे.सोमय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी’, मुंबई यांनी तिसरे स्थान पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता ठरलेला निरमा युनिव्हर्सिटी संघ व्हिएतनाममधील निन्हबिन्ह येथे होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय रोबोकॉन’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त प्रा. डॉ.विश्वनाथ कराड, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसचे कार्यकारी संचालक डॉ.सुनिल कराड, दूरदर्शनचे अतिरिक्त सरसंचालक एम. एस. थॉमस, मॅथवर्क्स अॅप्लीकेशन इंजिनिअरींग ग्रुपचे व्यवस्थापक प्रशांत राव, आरओएचएमचे व्यवस्थापकीय संचालक नाकामुरा दाईसुके, जेनेटिक्स इंडिया प्रा.लि.चे अतिरिक्त सरव्यवस्थापक नचिकेत जोशी,एमआयटी आयडीचे डीन प्रा.अनंत चक्रदेव, एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरींग, आळंदीचे संचालक डॉ. योगेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेतील ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह डिझाईन’ पुरस्कार आयआयटी रूरकी, बेस्ट रूकी पुरस्कार निओटेक इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी वडोदरा,बेस्ट आयडिया एलडी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अहमदाबाद,बेस्ट मॅन्युअल ऑपरेटर पुरस्कार व्हीजेटीआय मुंबई,बेस्ट अॅस्थेटिक रोबोट पुरस्कार सीओईपी,फास्टेट जॉब कम्पलिटींग रोबोट निरमा युनिव्हर्सिटी, प्रा.बालकृष्ण मेमोरियल पुरस्कार व डॉ.व्ही.डी.कराड पुरस्कार (ट्रॉफी,सुवर्णपदक आणि एक लाख रूपये रोख) विजेता संघ इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी निरमा युनिव्हर्सिटी यांना देण्यात आले. मॅथवर्कतर्फे दिला जाणारा पुरस्कार ‘युव्ही पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’  (प्रथम क्रमांक), ‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग,औरंगाबाद (द्वितीय क्रमांक) आणि  गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग,अमरावती व वीर सुरेंद्र साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी,बुर्ला (तृतीय क्रमांक) यांना देण्यात आला. मॅथवर्कतर्फे ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी’,कर्नाटक यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.बेस्ट शटलकॉक डिझाईन पुरस्कार रूस्तमजी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी ग्वाल्हेर यांना, आरओएचएम इनोव्हेशन पुरस्कार के.जे.सोमय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई यांना प्रदान करण्यात आला. 'द रोबू डॉट इन' पुरस्कार गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अवसरी यांना देण्यात आला.

 उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या संघांपैकी एमआयटी, व्हीआयटी,सीओईपी या पुण्यातील संघांचा तर के.जे.सोमय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई,निरमा युनिव्हर्सिटी, व्हीजेटीआय मुंबई आणि आयआयटी रूरकी,एलडी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचा समावेश होता. उपांत्यफेरीत एमआयटी, पुणेने के.जे.सोमय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई, यांना पराभूत केले तर निरमा युनिव्हर्सिटीने वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इन्स्टिट्युटला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना निरमा युनिव्हर्सिटी आणि एमआयटी, पुणे यांच्यात रंगला. 

मॅथवर्क्स अॅप्लीकेशन इंजिनिअरींग ग्रुपचे व्यवस्थापक प्रशांत राव म्हणाले, ‘रोबोकॉनमुळे तुमच्यातील कौशल्यांमध्ये वाढ होत आहे. भविष्यात करिअसाठी ज्याचा उपयोग होणार आहे.

रोबोकॉन संघवाढीच्या भावनेला प्रोत्साहन देत असल्याचे मत दूरदर्शनचे अतिरिक्त सरसंचालक एम.एस. थॉमस यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘२००२मध्ये फक्त दोन संघ ते २०१८ मध्ये १०७ संघ ही खूप मोठी कामगिरी आहे. रोबोकॉनसाठी एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन प्रारंभी केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. रोबोकॉनमुळे आम्हांला खूप चांगले व्यासपीठ मिळाले. विद्यार्थी कोणत्याही शाखेत गेले तरी रोबोटिक्सचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य महत्वाचे ठरेल. सर्जनशील मन, कल्पना आणि ध्येयास साध्य करण्यास लागणारी योग्य तंत्रे हा शिकण्याचा अद्भुत मार्ग आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link