Next
साखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा
संदेश सप्रे
Friday, August 17, 2018 | 01:00 AM
15 1 0
Share this story

अटलबिहारी वाजपेयी यांनी भेट दिलेला साखरपा येथील चौसोपी वाडा.

साखरपा (रत्नागिरी) :
अटलबिहारी वाजपेयी ३४ वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा या गावातील चौसोपी वाड्याला भेट दिली होती. त्यांच्या साधेपणाने गावकरी भारावून गेले होते. या छोट्या गावासाठी ती ऐतिहासिक घटनाच होती. ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे हे त्या भेटीचे साक्षीदार होते. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर गुणे यांनी त्या भेटीची आठवण जागवली.

दिनेश गुणे म्हणाले, ‘१९८३-८४मध्ये अटलबिहारी वाजपेयी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. तेव्हा कोल्हापुरातील रात्रीची सभा संपवून पहाटे ते रत्नागिरीकडे निघणार असल्याचा निरोप मिळाला. सर्व तयारी झाली. अटलजींसोबत प्रकाश जावडेकर होते. साखरपा हे माझे आजोळ. सरदेशपांडे यांचा चौसोपी वाडा हे तेथील प्रसिद्ध ठिकाण. याच आमच्या आजोळच्या गावी अटलजींचे पाय लागावेत, अशी सर्वांचीच इच्छा होती. मोठा भाऊ रमेश याने प्रकाशजींना निरोप पाठवला आणि अटलजींना थोडा वेळ आमच्याकडे थांबण्याची विनंती केली. ते नक्की झाले आणि संपूर्ण साखरपा गाव अटलजींच्या स्वागतासाठी सज्ज झाले.’

‘वाड्यावर तयारी झाली. साडेपाच वाजता माधव सरदेशपांडे, केशव सरदेशपांडे, तेव्हाचे सरपंच बाबीशेठ गांधी, समाजवादी नेते नाना शेट्ये अशी मोजकी माणसे स्वागताला तयार होती. काही वेळात गाड्यांचा लहानसा ताफा आला. जावडेकर लगबगीने खाली उतरले. त्यांनीच आणलेले हार-तुरे देऊन आम्ही अटलजींचे स्वागत केले. लगेच सारा लवाजमा वाड्यात आला. वाड्याचा दिमाख पाहून अटलजी भारावले आणि काही वेळातच त्यांनी सगळा वाडा फिरून पाहिला. नक्षीदार कलाकुसरीने नटलेल्या देवघरासमोर थांबून त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला. ओटीवर येऊन उपस्थितांबरोबर गप्पा  मारल्या. गप्पांसोबत दुग्धपान झाले. परिसराची माहिती घेताना त्यांनी दाखवलेला साधेपणा आमच्या मनात घर करून गेला. काही वेळातच अटलजींचा ताफा रत्नागिरीकडे रवाना झाला आणि त्यांना निरोप देताना सर्वानाच भरून आले होते. माझ्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिलेली ही त्यांच्या साधेपणाची आठवण आज अटलजींना कायमचा निरोप देताना पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहिली,’ असे गुणे यांनी सांगितले. 

अटलजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला साखरपा येथील तो चौसोपी वाडा आज भलेही रंगरूपाने बदलला असेल; मात्र या वाड्यातील त्यांच्या आठवणी  चिरकाळ टिकतील, हे नक्की.

(अटलजींवरील विशेष लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. - प्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी...)

वाड्याचे बाहेरून घेतलेले छायाचित्र. (छायाचित्र सौजन्य : गिरीश सरदेशपांडे, साखरपा)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ajit Jagannath Surve About 181 Days ago
Felt immense, pride n pleasure to have one of the greatest n most loved leaders of our country , BHARATRATNA late Shri. Atal Bihari Vajpayee at my native place , SAKHARPA.
0
0
पी एन सुर्वे. नाणीज. रत्नागिरी. महाराष्ट्र About 182 Days ago
मा. अटलजी वाजपेयी. याना भावपुर्ण श्रद्धांजली!
0
0
Subhsh karmarkar... About 183 Days ago
It is indeed a great. .memorble moment ..he was great humanbeing...
0
0
nandkumar karekar About 183 Days ago
ही आमच्या गावासाठीअभिमानास्पद गोष्ट आहे
0
0
Parag About 183 Days ago
Visit to a place so special for the family, creating everlasting "Atal" space in their memory
0
0
Aparna S Soman About 183 Days ago
एका माणूस म्हणून वंदनीय असलेल्या श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण मनाला खूप आनंद देऊन गेली ! आदर आणखी वाढला .
0
0
Deelip M Rajeshirke About 183 Days ago
GREAT HUMAN
1
0
Krutika jaygade About 183 Days ago
ही आमच्या गावासाठीअभिमानास्पद गोष्ट आहे
1
0
Ramjan Shaikh About 184 Days ago
अती उत्तम कामगिरी केली
0
0
Rupa Sawant About 184 Days ago
I am from sakharpa. feeling so proud
2
0
supriya pathare About 184 Days ago
sundar majhe gaon...feeling so proud
1
0
Pallavi Pramod Remane About 184 Days ago
Feeling proud.Aamachya Sakharpa gavat uttung vyakti matvache pay lagale hi khupach abhimanachi host aahe.
1
1
Katre About 184 Days ago
ही आमच्या गावासाठीअभिमानास्पद गोष्ट आहे
5
1

Select Language
Share Link