Next
‘बेगम जान’मधून ‘सुरों की आशा’
BOI
Friday, March 24, 2017 | 05:09 PM
15 2 1
Share this article:

मुंबई : बॉलिवूड आणि संगीत म्हटले की अर्थातच पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते आशा भोसले यांचे. गेली कितीतरी दशके आपल्या मधुर आवाजाने लाखो रसिकांना अक्षरशः वेड लावणाऱ्या आशा भोसले यांना बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ऐकण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांच्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटातील पहिलेवहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, ते आशा भोसले यांच्या आवाजातील आहे. 

या चित्रपटात विद्या बालन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘प्रेम मे तोहरे...’ असे या गाण्याचे बोल असून, नुकतेच हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. गीतकार कौसर मुनीर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या गाण्याला अनू मलिक यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले यांनी २०१३ नंतर चित्रपटासाठी गायलेले हे पहिलेच गाणे आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. 

प्रेम आणि यातना अशा संकल्पनेवर आधारित असलेले हे गाणे आशाजींच्या आवाजाने आणखी खुलले आहे. हे गाणे आपल्याला एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती देते. चित्रपटात विद्या बालन, इला अरुण, गौहर खान प्रमुख भूमिकेत असतील. येत्या १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 
15 2 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search