Next
अनाथ, वंचित मुलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद
रंगात न्हाऊन निघाली बालसेना
BOI
Monday, March 25, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:


पुणे :  आयुष्यावर दुःख, गरीबी, अज्ञान यांची सावली पडलेल्या अनेक वंचित मुलांच्या आयुष्यात रंगपंचमीच्या सणाने आनंदाचा रंग भरला. रंगपंचमीच्या सणानिमित्त बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळतर्फे वंचित, अनाथ व देवदासींच्या मुलांकरीता रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
वेगवेगळे रंग, पिचकाऱ्या बघून ही लहान मुले अगदी हरखून गेली होती. रंग खेळण्याची त्यांची धमाल चालली होती. भान विसरून  ही मुले एकमेकांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवत होती. त्यांच्या रंगलेल्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह यामुळे सगळे वातावरणच चैतन्यमय झाले होते.    
 
सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलींद भोई, शिरीष मोहिते, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील गिलबिले, शुक्रवार पेठ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, जमीर शेख, पृथ्वीराज येळवंडे, श्रीराम सुद्रीक, अमर गायकवाड, गणेश शिंदे, अक्षय शिंदे, अतुल शिंदे, जहीर शेख, दिग्विजय येळवंडे, युवराज येळवंडे, राजेश जाधव, शंकर गौडा आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

हनुमंत शिंदे म्हणाले, ‘बुधवार पेठेतील देवदासींच्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वाधार, मोहोर, फुलवा या संस्थामधील आणि शहरात रस्त्यावर फुगे विकणाऱ्या अशा तब्बल १५० चिमुकल्यांनी या रंगोत्सवात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते. सण-उत्सवांचा आनंद या मुलांनाही घेता यावा, याकरता अशा उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search