Next
शिका ‘पेपर क्विलिंग’ची कला
BOI
Monday, April 10, 2017 | 12:10 PM
15 15 0
Share this article:

पेपर क्विलिंगच्या कलाकृतीपुणे : गेल्या काही वर्षांत ‘पेपर क्विलिंग’च्या कलेचा आपल्याकडे वेगाने विस्तार होऊ लागला आहे. या कलेचा आविष्कार चित्रे, ग्रीटिंग कार्ड, इयररिंग्ज अशा विविध ठिकाणी दिसू लागला आहे. या मनमोहक कलाकृती पाहिल्यानंतर अनेकांना ही कला शिकण्याची इच्छा होते. अशा इच्छुकांसाठी पुण्यात एक संधी चालून आली आहे. ‘क्विल्स एन कर्ल्स’तर्फे पेपर क्विलिंग प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. येत्या १५ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर १७ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.  

पेपर क्विलिंग ही आपल्याकडे अगदी अलीकडच्या काळात बहरू लागलेली कला आहे. यात रंगीबेरंगी कागदांच्या फक्त गुंडाळ्या करून आणि त्या कलात्मकपणे एकत्र चिकटवून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. या क्विलिंगच्या जगताची सफर कलाप्रेमींना घडावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  
‘क्विल्स एन कर्ल्स’ हा कलाकार महिलांचा गट आहे. आठ ते सत्तर वयोगटातील या सगळ्याजणी आपापल्या छंदांमुळे आणि कलेबद्दल असलेल्या प्रेमामुळे एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. ‘क्विल्स एन कर्ल्स’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनात पेपर क्विलिंगच्या अनेक वस्तू बघण्याची आणि शिकण्याचीही संधी पुणेकरांना मिळणार आहे. यात पेपर क्विलिंगच्या फ्रेम्स, वॉल क्लॉक, थ्रीडी बाहुल्या, थ्रीडी वस्तू, इयररिंग्ज, फ्रीज मॅग्नेट्स आणि क्विलिंगच्या इतर अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.
ज्यांना पेपर क्विलिंगच्या वस्तू बनवायला शिकायच्या आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. १६ आणि १७ एप्रिलला दुपारी १२ ते दोन आणि दुपारी दोन ते सायंकाळी चार या वेळेत दोन बॅचमध्ये या कार्यशाळा होतील. या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. कार्यशाळेतून जमा झालेला निधी ‘क्विल्स एन कर्ल्स’तर्फे ‘मानव्य’ या संस्थेला देणगी म्हणून देण्यात येणार आहे.

प्रदर्शनस्थळीच म्हणजे बालगंधर्व कालादालनात या कार्यशाळा होणार आहेत. कलेला वयाचे बंधन नसते. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या कार्यशाळेत भाग घेऊ शकतात. तेव्हा हे प्रदर्शन आणि कार्यशाळेत जरूर सहभागी व्हा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क : राजश्री होनराव - ८८८८७ ९९७१८  
 
15 15 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun solanki About
Nice article and your project appreciable
0
0

Select Language
Share Link
 
Search