Next
प्रदूषण नियंत्रण संशोधनाबद्दल अमोल चाफेकर यांना शिष्यवृत्ती
लंडनच्या प्रसिद्ध संस्थेकडून सन्मान
BOI
Saturday, February 09, 2019 | 03:18 PM
15 0 0
Share this article:

अमोल चाफेकरपुणे : लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग या संस्थेकडून अमोल चाफेकर यांना त्यांच्या प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित उल्लेखनीय संशोधनाबद्दल ‘इनोव्हेशन इन पोल्युशन कंट्रोल’ ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यात सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण असून, दोन आठवड्यांचे ऑनसाइट प्रशिक्षण असणार आहे.

न्यूटन फंड प्रोग्रामच्या अंतर्गत काही मोजकेच संशोधक या शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. भारतातून १५ संशोधक निवडले गेले. त्यात पुण्याचे अमोल चाफेकर हे एकमेव संशोधक आहेत. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधकांमध्ये उद्योजक क्षमता आणि व्यावसायिकीकरणाच्या कौशल्यांची निर्मिती करण्याचा हेतू आहे. अतिशय कठीण निवड प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात येते. संशोधनाचे कौशल्य, नवकल्पनाची क्षमता, संशोधनाचे सामाजिक आणि आर्थिक फायदे या आधारांवर संशोधकांची पारख करून निवड केली जाते.

ही शिष्यवृत्ती फिलीपाईन्स, केनिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पेरू, मेक्सिको, कोलंबिया, ब्राझिल, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चिली, चीन, इजिप्त, तुर्की येथील वैज्ञानिक आणि संशोधकांही देण्यात आली आहे.



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search