Next
सिंधुदुर्गातील ‘स्वररत्न’ शोधण्यासाठी अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धा
दहा हजारांच्या पारितोषिकासह ‘आषाढी’ला लक्ष्मीनारायण मंदिरात गाण्याची संधी
BOI
Monday, May 06, 2019 | 04:12 PM
15 0 0
Share this article:

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) : वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त ‘स्वरसिंधुरत्न’ या अभंग, भक्तिगीत आणि सुगम संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि प्रौढ अशा तीन वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, प्रत्येक गटातील अंतिम फेरीतील विजेत्याला १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच आषाढी एकादशीदिवशी (१२ जुलै २०१९) श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आपली कला सादर करण्याची संधीही या विजेत्यांना मिळणार आहे. नावनोंदणी करून अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख १५ मे आहे. 
 
शालेय (पाच ते १२ वर्षे), महाविद्यालयीन (१२ ते १८ वर्षे) आणि प्रौढ (१८ ते ४० वर्षे) अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार असून, केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांनाच या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. विभाग एक (देवगड, वैभववाडी, कणकवली), विभाग दोन (कुडाळ, मालवण) आणि विभाग तीन (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग) अशा टप्प्यांत तालुकास्तरीय स्पर्धा होणार आहे. तालुका स्तरावरील स्पर्धेतून प्रत्येक विभागातून तीन स्पर्धक निवडून त्यांना अनुक्रमे एक हजार, ७५० आणि ५०० रुपयांचे पारितोषिक, तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

प्रत्येक विभागातील प्रथम दोन क्रमांकांची अंतिम स्पर्धा दोन जून रोजी कुडाळमध्ये होईल. त्यातून प्रत्येक विभागातून एकाची स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. या विजेत्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि आषाढी एकादशीला वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरात गाण्याची संधी दिली जाणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. त्याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

डॉ. प्रणव प्रभू यांच्या नेचर क्युअर सेंटरच्या सौजन्याने श्री शंकरा, दादर, मुंबई आणि श्री देव लक्ष्मीनारायण भक्तांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

नावनोंदणीची अंतिम तारीख : १५ मे २०१९
अधिक माहिती, अर्ज आणि नावनोंदणीसाठी संपर्क : प्रा. प्रशांत धोंड - ९४०३६ ५१५३८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search