Next
‘पेटीएम’तर्फे डिजिटल गोल्ड आणि सोने खरेदीवर बक्षिसे
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : दिवाळीचे औचित्य साधून सणाच्या दिवसांत पेटीएम गोल्ड खरेदी केल्यास त्यावर मोफत सोने आणि १० कोटींची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे ‘पेटीएम’च्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ या कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. पेटीएम गोल्डच्या खरेदीवर १० हजारांपर्यंत अतिरिक्त सोने बक्षीस म्हणून दिले जाणार असून, दहापट अतिरिक्त सोने जिंकण्यासाठी लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे; तसेच १०० भाग्यवान विजेत्यांना पेटीएम गोल्ड खरेदीवर २२ कॅरेट सोन्याचे पेंडंट जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सणासुदीला सोने भेट देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पेटीएमने सोने भेट देणे अधिक सुलभ केले आहे. ग्राहक आता एकमेकांना पेटीएम गोल्ड भेट देताना एक थीम कार्ड निवडू शकतात. या उपलब्ध थीममध्ये ‘दिवाळी’, ‘भाऊबीज’, ‘थॅंक यू’, ‘बर्थ डे’, ‘शुभेच्छा’ आणि ‘शगुन’ आदींचा समावेश आहे. या कंपनीने पेटीएम गोल्डसाठी एमएमटीसी-पीएएमपीसोबत आता ऑग्मॉन्ट गोल्डलाही नवीन भागीदार केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितिन मिश्रा म्हणाले, ‘दिवाळीच्या दिवसांत ग्राहकांसाठी आमच्याकडे डिजिटल गोल्ड आणि सोन्याच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स आहेत. आम्ही ऑग्मॉन्ट या आणखी एका जागतिक दर्जाच्या सोन्याच्या रिफायनरीशी भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना २४ कॅरेट ९९९ शुद्धतेचे सोने मिळेल आणि ते पेटीएम अॅपचा उपयोग करून लवकरच ज्वेलरीप्रमाणे रिडीम करता येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search