Next
निवासी मालमत्तांच्या किमती ‘जैसे थे’
प्रेस रिलीज
Monday, May 21, 2018 | 03:39 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पुण्यातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत जानेवारी ते मार्च २०१८ या पहिल्या तिमाहीत ‘जैसे थे’ स्थिती दिसून आली आहे. मालमत्तांच्या प्रति चौरस फूट किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. मालमत्ता भाड्याने देण्याच्या बाजारपेठेत मालकाला अपेक्षित किमान दरात (आस्क रेट) थोडी वाढ झाली आहे. नवीन गृहप्रकल्प दाखल होण्याचे प्रमाणही मर्यादित राहिले आहे.  ‘महारेरा’ अंतर्गतचे नियामक प्राधिकरणही मालमत्तांच्या विक्रीत फारशी सुधारणा घडवून आणू शकलेले नाही’, अशी माहिती ‘९९ एकर्स डॉट कॉम इनसाईट’ या तिमाही अहवालात देण्यात आली आहे.

देशातील आठ प्रमुख शहरांतील भांडवली व भाड्याच्या किंमतींचे कल यात अभ्यासण्यात आले आहेत.   यासंदर्भात माहिती देताना ‘९९ एकर्स डॉट कॉम’चे मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष उपाध्याय म्हणाले, ‘पुण्यातील किंमत-संवेदनशील बाजारपेठेने गेल्या तिमाहीत भांडवली अपेक्षित किमान दर व विक्रीचा वेग यामध्ये ‘जैसे थे’ स्थिती राखली आहे. शहरांच्या एकंदर मालमत्तांच्या मागणीमध्ये किफायती व मध्यम-उत्पन्न गटाने वर्चस्व राखले असून, त्याचा वाटा तीन चतुर्थांशापेक्षा अधिक आहे. ‘महारेरा’सारखे ताकदवान नियामक प्राधिकरण असताना आणि विकसकही वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नियमांचे पालन करत असतानाही, संभाव्य गृहखरेदीदार बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांपेक्षा तयार मालमत्तांचा पर्याय निवडत आहेत. बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांच्या लोकप्रियतेत आधीच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यंदा किंचित वाढ दिसून आली आहे. विक्रीचा वेग सुधारण्यावर विकसक सातत्याने भर देत असल्याने, मालमत्तांच्या किंमती आगामी काळातही नियंत्रणात राहतील अशी अपेक्षा आहे. किफायती घरांची सध्या तीव्र टंचाई असून, त्यांची मागणी व पुरवठा यातील तफावत तब्बल २२ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search