Next
रॉबर्ट सिल्व्हरबर्ग
BOI
Monday, January 15 | 03:45 AM
15 0 0
Share this story

लागोपाठच्या तीन वर्षांत ६२, १०१ आणि ८४ इतक्या कथा, तर १९६५ साली आठवड्याला सरासरी ५० हजार शब्द असा लेखनाचा झपाटा दाखवणारा विज्ञानकथालेखक रॉबर्ट सिल्व्हरबर्ग याचा १५ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
....... 
१५ जानेवारी १९३५ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला रॉबर्ट सिल्व्हरबर्ग हा अमेरिकेचा बहुप्रसवा विज्ञानकथाकार म्हणून प्रसिद्ध आहे.

त्याचा कथालेखनाचा झपाटा विलक्षण होता. विज्ञानकथा, रहस्यकथा, वेस्टर्न स्टोरीज, क्रीडाविश्वाशी निगडित कथा, हॉररकथा अशा विविध विषयांवर तो कथा लिहित असे. १९५६-५७-५८ ही तीन वर्षं त्याने कमालच केली होती. १९५६ साली त्याच्या ६२ कथा प्रसिद्ध झाल्या होत्या, तर त्याच्या पुढच्या वर्षी त्याने तब्बल १०१ कथा लिहिल्या होत्या आणि पुन्हा १९५८ साली त्याच्या ८४ कथा प्रसिद्ध झाल्या होत्या... १९६५ साली तो आठवड्याला सरासरी ५० हजार शब्द इतका मजकूर लिहित होता!!

उत्कृष्ट विज्ञानकथांसाठी असणारे ह्युगो पुरस्कार त्याला ‘नाइटविंग्ज’, ‘गील्गामेश इन दी आउटबेक’ आणि ‘एंटर ए सोल्जर’ कादंबऱ्यांसाठी मिळाले होते, तर प्रतिष्ठेचा नेब्युला पुरस्कार ‘ए टाइम ऑफ चेंजेस’, ‘बॉर्न विथ दी डेड’ आणि ‘सेलिंग टू बायझँटिअम’साठी मिळाले होते. 

त्याच्या कादंबऱ्यांमध्ये ‘कालप्रवास’ ही संकल्पना मुक्तपणे वापरली गेलेली दिसते. 

विज्ञानकथा आणि कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्याने पन्नासहून अधिक पुस्तकं इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रावर लिहिलेली आहेत.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link