Next
आयुक्तांनी घेतला ‘खेलो इंडिया २०१९’च्या व्यवस्थांचा आढावा
प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी केली पाहणी
BOI
Monday, January 07, 2019 | 06:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘खेलो इंडिया २०१९’ क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील ‘शिवछत्रपती क्रीडा नगरी’स भेट दिली. या वेळी ‘खेलो इंडिया’ची संयोजन समिती आणि क्रीडा अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व व्यवस्थांचा आढावा घेत तयारीबाबत संपूर्ण माहिती घेतली. 

क्रीडानगरीतील बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, ज्युदो, कुस्ती संकुल यांसह विविध खेळ, नेमबाजी केंद्र, खेळाडू व पदाधिकाऱ्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थांच्या तयारीबाबत तसेच तेथील सुविधा, सोयींचा लिमये यांनी आढावा घेतला. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बॅडमिंटन सभागृहात होणार असून तेथील आसन व्यवस्था, उद्घाटन सोहळ्याची इतर तयारी याबाबत त्यांनी माहिती करून घेतली. 

सुनील केंद्रेकर आणि नरेंद्र सोपल यांनी सर्व व्यवस्थेबाबतची माहिती लिमये यांना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य करून स्पर्धेच्या यशस्वी नियोजनाच्या दृष्टीने काम केले जाईल, असा विश्वास लिमये यांनी या वेळी व्यक्त केला.

या पाहणीच्या वेळी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राज्याच्या क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव आणि ‘खेलो इंडिया संयोजन समिती’चे अध्यक्ष राजेंद्र पवार, क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर, राज्याच्या क्रीडामंत्र्यांचे स्वीय सचिव श्रीपाद ढेकणे आदी या वेळी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link