Next
‘टाटा कॅपिटल फायनान्शिअल’ची एनसीडी विक्री
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सहा लाख रुपयांपर्यंतच्या सिक्युअर्ड, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची (सिक्युअर्ड एनसीडी) आणि प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या अनसिक्युअर्ड, सबऑर्डिनेटेड, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची (अनसिक्युअर्ड एनसीडी) एकूण साडेसात लाखांपर्यंतच्या एनसीडींच्या खुल्या विक्रीला १० सप्टेंबरपासून सुरुवात केली जाणार आहे. ट्रांच वन इश्यूचे प्रमाण दोन लाख रुपये असून साडेसात लाखांपर्यंत  ओव्हरसबस्क्रिप्शन करता येईल.  

ही विक्री २१ सप्टेंबर रोजी बंद होणार असून, कंपनीच्या संचालक मंडळाने किंवा संचालक मंडळाच्या वर्किंग कमिटीने ठरवल्याप्रमाणे, विक्री अगोदर बंद करण्याचा किंवा मुदतवाढ करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.  ट्रांच वन इश्यूअंतर्गत प्रस्तावित असलेल्या या एनसीडींना क्रिसिलने १५ ऑगस्ट २०१८रोजीच्या पत्राद्वारे साडेसात लाखांपर्यंतच्या रकमेसाठी ‘क्रिसिल एएए/स्थिर’ असे रेटिंग दिले व त्यानंतर २७ ऑगस्ट रोजीच्या पत्राने हे रेटिंग पुन्हा वैध केले आणि केअर रेटिंग्जने १४ ऑगस्ट रोजीच्या पत्राद्वारे साडेसात  लाखांपर्यंतच्या रकमेसाठी ‘केअर एएए; स्थिर’ असे रेटिंग दिले व त्यानंतर २७ ऑगस्ट रोजीच्या पत्राने हे रेटिंग पुन्हा वैध केले. क्रिसिलने एनसीडींना दिलेले रेटिंग आर्थिक दायित्व वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीतील अधिक प्रमाणात सुरक्षितता दर्शवते.

टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे अकार्यकारी अधिकारी राजीव सभरवाल यांनी सांगितले, ‘टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी रिटेल, एसएमई व कमर्शिअल फायनान्स अशा संपत्तींसाठी वैविध्यपूर्ण व्यासपीठ आहे. एएए रेटिंग, विस्तृत वितरण जाळे व सक्षम तंत्रज्ञान यांचा लाभ घेऊन एनबीएफसी क्षेत्रातील प्रगतीच्या संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनी सक्षम आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही आगामी काळात डिजिटलचे प्रमाण वाढवणार आहोत.’

अर्जाची किमान रक्कम सर्व पर्याय मिळून दहा हजार रुपये आहे आणि सर्व पर्यायातील मिळून किमान रक्कम पार केल्यानंतर प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, एका एनसीडीच्या पटीत अर्ज करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार अॅलॉटमेंट केली जाईल. एनसीडींच्या खुल्या विक्रीच्या निव्वळ रकमेतील किमान ७५ टक्के रक्कम ऑनवर्ड लेंडिंग, अर्थसहाय्य आणि कंपनीच्या सध्याच्या कर्जांचे व्याज व मुद्दल यांच्या परतफेडीसाठी, मुदतीपूर्वी फेडीसाठी वापरली जाणार आहे. जास्तीत जास्त २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम कंपनीच्या सर्वसाधारण बाबींसाठी वापरली जाईल.

२९ ऑगस्ट रोजीच्या सेल्फ प्रॉस्पेक्टस व ट्रांच वन प्रॉस्पेक्टस यामार्फत विक्री केल्या जाणाऱ्या एनसीडींची नोंदणी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे करण्याचे प्रस्तावित आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search