Next
कोने एलिव्हेटर्सचे पुण्यात जागतिक प्रशिक्षण केंद्र
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 05:56 PM
15 0 0
Share this story

कोने एलिव्हेटर्सच्या पुण्यातील नवीन कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी कंपनीच्या  विभागीय संचालक अंबरीश जोंधळे, व्यवस्थापकीय संचालक अमित गोसाईन, प्रकल्प विभाग संचालक राजेश बायवार
पुणे : ‘कोने’ या जगातील एलिव्हेटर्स आणि एस्कलेटर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने पुण्यात दोन नवीन कार्यालये सुरू केली असून यात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश आहे.याचे उद्घाटन कोने इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसाईन यांच्या हस्ते झाले. या वेळी पश्चिम विभागाचे संचालक अंबरीश जोंधळे, प्रकल्प विभाग संचालक राजेश बायवार उपस्थित होते.

‘ग्राहकांच्या सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि भविष्यातील वाढीसाठी ही गुंतवणूक करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयामध्ये एलसीई सिम्युलेटर्स, मिनी एक्सटी, एनएमएक्स मशीन अशा अद्ययावत तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश असल्याचे’, गोसाईन यांनी सांगितले.
 
ते म्हणाले, ‘कोने इंडियाचा उद्देश्य सेवांच्या क्षमतेचा विस्तार करणे आणि पुण्यात देऊ करण्यात येत असलेल्या सेवांना सातत्याने पाठिंबा देणे हे आहे. ही दोन नवीन कार्यालये आमच्या ‘विन विथ कस्टमर्स’ आणि ग्राहकांपर्यंत आमची पोहोच वाढविणे, महाराष्ट्रातील बाजारपेठेत सखोलपणे शिरकाव करणे तसेच महाराष्ट्रातील ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करणे या दृष्टिकोनातून बनविली गेली आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या कर्मचार्यांदना सुसज्ज करण्यासाठी आमचे प्रशिक्षण केंद्र हे वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे. येथे एक्सक्लुसिव्ह कस्टमर एक्सपिरियन्स सेंटरही आहे. तिथे नवीनतम व्हिज्युअल डिझाइन्स दर्शविली आहेत ज्यामुळे ग्राहकांना एक चांगला अनुभव मिळेल.व्यावसायिक एलिव्हेटर्स आणि एस्कलेटर्सच्या देखभालीच्या सेवेच्या वाढत्या मागणीस प्रतिसाद देण्यासही यामुळे मदत होईल.’  

‘आयबीएमसमवेत सहयोग केला असल्यामुळे नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यास आणि डिजिटलायझेशनची क्षमता वाढविण्यास पुढे कोनेला मदत होईल. आयबीएमच्या वॅटसन आयओटी क्लाऊड प्लॅटफॉर्मचा वापर करून जगभरातील सध्याच्या सर्व्हिस ऑपरेशन्समध्ये सुधार आणणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे हा हेतू आहे. एलिव्हेटरची देखभाल, गती, विश्वसनीयता व सुरक्षा तसेच; रिमोट मॉनिटरिंग व सर्व्हिसिंगसाठी नवीन स्मार्ट बिल्डिंग अॅप्लीकेशन्सचा देखील समावेश आहे.’असे गोसाईन यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link