Next
दुष्काळातून तरण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘संवादसेतू’
अडचणी जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने सहा दिवसांत २७ हजार लोकप्रतिनिधींशी संवाद
BOI
Wednesday, May 15, 2019 | 05:26 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास गतिमान प्रशासनाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लागू शकतो, याची प्रचिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘संवादसेतू’ या उपक्रमातून आली आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, मुख्यमंत्र्यांनी मागील सहा दिवसांत तब्बल २७ हजार ४४९ लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देतानाच प्रत्येक तक्रारीचे यथायोग्य निवारण करण्याची व्यवस्थाही उभारली आहे.

‘ऑडिओ ब्रिज’च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सहा दिवसांत २२ जिल्ह्यांतील १३९ तालुक्यांपर्यंत पोहोचता आले. या २२ जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वर्धा, नागपूर, वाशिम यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे संवादसेतू उपक्रम आयोजित करण्यात आला. ऑडिओ ब्रिज या आधुनिक तंत्रामुळे एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेशी संवाद साधणे शक्य होते. त्यामुळे कमी कालावधीत व्यापक क्षेत्रावर संपर्क साधून दुष्काळ निवारणाच्या कामांचा जलद गतीने आढावा घेणे शक्य झाले.

या उपक्रमामध्ये मुख्यमंत्री जेव्हा प्रत्यक्ष सरपंचांशी संवाद साधत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव, दुष्काळी उपाययोजनांशी संबंधित खात्यांचे प्रधान सचिव इत्यादी अधिकारी हजर होते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक हे सारे ऑडिओ ब्रिजवर उपलब्ध असत. अनेक पालक सचिवांनीही संबंधित जिल्ह्यांतून या आढाव्यात सहभाग नोंदवला. त्यामुळे संबंधित सरपंचांनी मांडलेली तक्रार एकाच वेळी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालक सचिव आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी ऐकू शकत होते. या तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेले निर्देशही त्याच वेळी प्रत्यक्ष सरपंचांपर्यंतही पोहोचत होते.

या उपक्रमातून ८८४ सरपंच थेट मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्यांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. ज्यांना संवादात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विविध व्हॉट्स्अॅळप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या २२ जिल्ह्यांना एकूण १७ व्हॉट्स्अॅाप क्रमांक देण्यात आले. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून १३ मे २०१९पर्यंत सुमारे चार हजार ४५१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील दुष्काळाशी संबंधित तक्रारी दोन हजार ३५९ होत्या.

या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठीही एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र ‘एक्सेल शीट’ तयार करण्यात आली आहे. त्यात प्राप्त झालेली तक्रार, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश, स्थानिक प्रशासनाने केलेली कार्यवाही असा प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबतचा अहवाल थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय जे प्रश्न धोरणात्मक बाबींशी निगडित आहेत, त्यावरही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ‘एकमेकांना देऊ साथ-दुष्काळाशी करू दोन हात’ हा उद्देश यातून साध्य करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 143 Days ago
Is somebody is looking into the basic problem. -- why water is becoming more scare ? Availability of water is part of the infrastructure of a society . Any society wil perish if water becomes unavailable .
0
0

Select Language
Share Link
 
Search