Next
डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान जाहीर
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते दहा जणांचा सन्मान
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 01:43 PM
15 0 0
Share this article:

संजय यादवरावडॉ. सुमंत पांडेपुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ जाहीर झाले आहेत.

गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक आणि माजी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, पुण्यातील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन, पुण्यातील यशदा जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. सुमंत पांडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, दंत शल्य चिकित्सक डॉ. जे. बी. गारडे यांना डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ ने गौरविण्यात येणार आहे. या वर्षीच्या डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मानसाठी पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटनासाठी किशोर धारिया, ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माणासाठी राजेंद्र आवटे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंगसाठी संजय भंडारी यांची निवड करण्यात आली आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मानसाठी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बूटवाला आणि महाविद्यालयाच्याच ऑफिस सुप्रिटेंडंट जुलेखा शेख यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आझम कॅम्पसमधील असेंब्ली हॉलमध्ये केले जाणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी डॉ. इनामदार हे आपला ७४ वा वाढदिवस साजरा करणार असून, सन्मानाचे हे दशकपूर्ती वर्ष आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search