Next
महेश धानकेंना राज्यस्तरीय वृत्तरत्न पुरस्कार जाहीर
मिलिंद जाधव
Thursday, January 31, 2019 | 12:52 PM
15 0 0
Share this story

महेश धानकेशहापूर : तालुक्यातील पत्रकार, तसेच लोकहिंद न्यूज चॅनल व शिवमार्ग लाइव्ह या वृत्तवाहिनींचे परखड आणि अभ्यासू संपादक महेश धानके यांना कोल्हापूर येथून प्रकाशित होत असलेल्या ‘आजची रणरागिणी’ या साप्ताहिकाच्या वतीने २०१९चा राज्यस्तरीय वृत्तरत्न सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीरनगरीत तीन फेब्रुवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

‘आजपर्यंत केलेल्या अभ्यासू लेखणीचाच हा गौरव असून, हा पुरस्कार लोकहिंद टीमच्या संघटीत व्यवस्थापन कौशल्याची व आतापर्यंत पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीची ही पोचपावतीच आहे,’ अशी प्रतिक्रिया धानके यांनी व्यक्त केली.

लोकहिंद-शिवमार्गची टीम हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापूर दौरा करणार आहे. महेश धानके यांचा हा सन्मान म्हणजे लोकहिंद-शिवमार्ग लाइव्ह चॅनलचा गौरव आहे. धानके हे काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुकाध्यक्ष असले, तरी त्यांचा मूळचा पिंड पत्रकारीता व समाजसेवेचाच आहे. लेखणी, वाणी व साहित्यिक बाणा जोपासत ते माजी उपसभापती म्हणूनही यशस्वी झाले आहेत. ते उत्तम प्रवचनकार, प्रबोधनका आणि एक सामाजिक जाण व भान असलेले कवीदेखील आहेत.

किन्हवली जवळच्या नांदगाव या छोट्याशा खेड्यातून प्रवास करत धानके हे नाव आज राजकारण व समाजकारणात संघर्षाची भाषा झेलत पुढे आले आहे. लोकहिंद व शिवमार्ग या वृत्त वाहिन्यांवर रोज दिसणारा हा संपादकीय चेहरा आता हजारो लोकांना आपला जवळचा वाटत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link