Next
शिर्डी येथे समर्पण ध्‍यानयोग महाशिबीर
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 12:04 PM
15 0 0
Share this story

शिर्डी : ‘येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्यातर्फे परमपूज्‍य सद्गुरू श्री शिवकृपानंद स्‍वामीजींच्‍या सान्निध्‍यात समर्पण ध्‍यानयोग महाशिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे महाशिबीर २३ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीत शिर्डी येथे नवीन साईप्रसादालयाजवळील शेती महामंडळाच्‍या मैदानावर सायंकाळी सात ते नऊ यावेळेत होईल,’ अशी माहिती संस्थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली

ते म्हणाले, ‘श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असून, श्री साईबाबा संस्‍थानतर्फे श्री साईबाबा समाधीचा शताब्‍दी सोहळा एक ऑक्‍टोबर २०१७ ते १८ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. या निमित्‍ताने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्‍मक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यानुषंगाने मुंबई येथील योग प्रभा भारती (सेवा संस्‍था) ट्रस्‍टच्‍या सौजन्‍याने सद्गुरू श्री शिवकृपानंद स्‍वामीजींच्‍या सान्निध्‍यात समर्पण ध्‍यानयोग महाशिबीराचे आयोजन केले आहे. या समर्पण ध्‍यानयोग महाशिबिरात सर्वांसाठी निःशुल्‍क प्रवेश असणार आहे.’

या महाशिबिरात समर्पण ध्‍यानयोगाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्‍वामीजी यांनी आपल्‍या आध्‍यात्मिक जीवनातील अनुभवांच्‍या आधारे दिलेल्‍या आशिर्वचनांचा लाभ मिळणार आहे. आपल्‍या सुलभ शैलीत ते आध्‍यात्मिक प्रगतीचे महत्त्व काय आहे आणि सामान्‍य मनुष्‍य देखील ध्‍यानाद्वारे आध्‍यात्मिक मार्गावर पुढे जात स्‍वतःच्‍या, कुटुंबाच्‍या, देशाच्‍या आणि संपूर्ण मानवजातीचा सर्वांगीण विकास कसा करू शकतो याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याबरोबरच मनुष्‍यदेहात असणारी कुंडलिनी शक्‍ती, सात चक्रे, तीन नाड्या, आभामंडळ (ऑरा) यांसारख्‍या गहन विषयांबद्दलही माहिती देत ध्‍यानसाधना करवून घेणार आहेत.

‘जास्‍तीत जास्‍त साईभक्‍तांनी, शिर्डी ग्रामस्‍थांनी व कर्मचाऱ्यांनी या ध्‍यानयोग शिबिराचा लाभ घ्‍यावा,’ असे आवाहन डॉ. हावरे यांनी केले आहे.

महाशिबिराविषयी :
दिवस : २३ ते ३० एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी सात ते नऊ
स्थळ : नवीन साईप्रसादालयाजवळील शेती महामंडळाचे मैदान, शिर्डी, नाशिक.
अधिक माहितीसाठी संपर्क : उमेश पै- ९८२०३ ४९००४, शर्मिला पाटील- ९८६९६ १९९७७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link