Next
‘कॉर्निंग’तर्फे वराळे गावात नवी शालेय इमारत
प्रेस रिलीज
Saturday, September 01, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : कॉर्निंग इंडियातर्फे चाकण येथे वराळे जिल्हा परिषदेच्या नव्या शालेय इमारतीचे उद्घाटन कॉर्निंग इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर अमित बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कॉर्निंग इंडियाचे प्लांट मॅनेजर सुभाजीत दास, वराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबी बुट्टेपाटील, जिल्हा परिषद पुणे जिल्ह्याच्या इंदिरा असवर, शरद बुट्टेपाटिल, संजय नाईकाडे, सागर आंध्रे आणि विश्वास बुट्टेपाटील आदी उपस्थित होते. सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून ‘कॉर्निंग’तर्फे ५८ विद्यार्थ्यांसाठीच जागा असलेल्या या ३० वर्षं जुन्या शालेय इमारतीऐवजी शाळेची नवी इमारत बांधण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते चौथीचे ९० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत.

‘कॉर्निंग’चे मॅनेजिंग डिरेक्टर अमित बन्सल म्हणाले, ‘कॉर्निंगने जगभरात नेहमीच सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे, जबाबदारीचे भान ठेऊन व्यवसाय आणि उत्पादन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही ज्यांना सेवा देतो अशा आमच्या लोकांना, आमच्या समाजाला पाठिंबा देणे, हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. सकारात्मक पर्यावरण, समाज आणि प्रशासनाशी संबंधित व्यवसाय करण्याप्रती आमची वचनबद्धता आहे आणि यामुळे कंपनीला अधिक बळ मिळते, भागधारकांचा विश्वास राखता येतो आणि ग्राहकांना आणि समाजाला अधिक चांगली सेवा देणे शक्य होते.’

जिल्हा परिषद पुणे जिल्ह्याचे शरद बुट्टेपाटील म्हणाले, ‘आमच्या जिल्हा परिषदेच्या वराळे येथील शालेय विद्यार्थ्यांना सातत्याने पाठिंबा देण्यासाठी आम्ही कॉर्निंग इंडियाचे मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातील नेतृत्वांच्या ज्ञान आणि माहितीसाठी शिक्षण हाच पाया आहे आणि नव्या इमारतीमुळे समाजातील मुलांसाठी शिक्षणाची प्राथमिक पायरी खुली होत आहे.’

जिल्हा परिषदेच्या वराळे शाळेबरोबरच्या दीर्घकालीन संलग्निततेद्वारे ‘कॉर्निंग’ने यापूर्वी ई-लर्निंग सुविधा आणि पाणी शुद्धीकरण उपकरणे पुरवली आहेत. अलीकडील प्रकल्पाअंतर्गत ‘कॉर्निंग’ने शाळेच्या प्राधिकरणाबरोबर नव्या इमारतीची रचना केली आणि विद्यार्थ्यांना क्रिटएटिव्ह आणि उत्साहवर्धक शालेय इमारत देऊ केली आहे. येत्या काही वर्षात पुढच्या इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा ‘कॉर्निंग’चा विचार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link