Next
खंडेरायाला सूर्यकिरणांचा अभिषेक
BOI
Thursday, March 29 | 05:24 PM
15 0 0
Share this story

जेजुरी गड, खंडोबा मंदिर

जेजुरी : महाराष्ट्राचं लाडकं लोकदैवत जेजुरीतील खंडोबा गडावर भूपाळी आरती झाल्यावर पूर्वेकडून सूर्यनारायणाने आपल्या सोनेरी छायेने आगमन करत खंडेरायाच्या मार्तंड भैरव मूर्तीला आपल्या किरणांचा अभिषेक केला. हे मनमोहक असे दृश्य आज (२९ मार्च) सकाळी जेजुरी गडावर पाहायला मिळाले.

जेजुरीचा खंडोबा हे लोकदैवत आणि परंपरेची जागृत देवता मानली जाते. यामुळे याठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळ असे दोन्ही वेळेस जलाभिषेक व इतर धार्मिक विधी केले जातात. यातच चैत्र महिन्याची चाहूल लागताच, सूर्य आपल्या आगमन मार्गातून थेट खंडोबा देवालयात प्रवेश करीत आपल्या किरणांचा जणू अभिषेक करतो आहे, असे मनमोहक दृश गडावर पाहायला मिळते. 

सकाळी सूर्याची किरणे थेट मंदिरात आली आणि थेट मूर्तींना स्पर्श करू लागली. सध्या सूर्यकिरण मार्गात दीपमाळा, नदीमंडप जरी लागत असला, तरी सूर्यकिरण थेट मंदिरात पोहोचतात.   

खंडेरायाची मानाची चैत्री पोर्णिमा यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने भाविकांची संख्या हजारोंच्या घरात जेजुरीत येत आहे. खंडेरायाच्या दर्शनसाठी आल्यानंतर हा अनोखा किरणोत्सव पाहण्याचाही आनंद भाविक घेत आहेत आणि धन्य होत आहेत. ‘येळकोट येळकोट जय मल्हार..’च्या गजरात भाविक या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. 

(जेजुरी गडावरील हे नयनरम्य दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link