Next
‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘बाजारपेठेमधील रोखीच्या तरलतेची स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँकेद्वारा तीन खुल्या बाजारपेठेचा पर्याय (ओएमओ) उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच बँकांनी त्यांच्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरामद्धे वाढ करण्यास सुरुवात केली असून बँक ऑफ महाराष्ट्र देखील नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करेल,’ असे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए. सी. राउत यांनी सांगितले.

आर्थिक धोरणाविषयी उद्धरण करताना राउत म्हणाले, ‘विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार रेपो दरातील २५ बेसिस पॉइंट्सची वृद्धी बाजारातील अपेक्षांनुसार आहे. रिझर्व्ह बँकेची ही घोषणा व्यापारामधील युद्धसदृश (ट्रेड-वॉर्स) भीती, जागतिक अनिश्चितता, किमान आधार दराच्या (एमएसपी) वाढीचा प्रभाव आणि गेल्या काही महिन्यांमध्ये पाहिल्या गेलेल्या चलनवाढीच्या वृद्धी यावर आधारित आहे, जी की नजीकच्या काळात ग्रामीण भागावरील चलनवाढीवर व्यापक प्रभाव टाकू शकेल.’

‘उदयोन्मुख संरक्षणात्मक प्रवृत्ती आणि रुपयाचे अवमूल्यन पहाता रिझर्व्ह बँकेने द्वै-व्यवहार रक्षण (करन्सी-हेजिंग) तसेच फेमा-२५ यांच्या महत्त्वाकडे लक्ष आकर्षित केले आहे. सरकारी रोखे बाजाराकडे मोठा आणि अधिक सहभाग आकर्षित होण्यासाठी सध्याचा आर्थिक परिस्थितीमधील तेजी पहाता रिझर्व्ह बॅंकेला अधिक लक्ष देणे आणि इनवर्ड्स तसेच एसजीएल-सीजीएल मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी प्रेरित केले आहे,’ असे राउत यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link