Next
‘टाटा स्काय’तर्फे सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत घट
प्रेस रिलीज
Monday, May 27, 2019 | 12:10 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशन मंचातर्फे स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) आणि हाय डेफिनेशन (एचडी) सेट बॉक्सच्या किंमती ४०० रुपयांनी कमी केल्या आहेत. टाटा एसडी आणि एचडी सेट टॉप बॉक्स आता अनुक्रमे एक हजार ६०० आणि एक हजार ८०० रुपयांना उपलब्ध असतील. विविध प्रकारच्या डिजिटल दर्जेदार वाहिन्या आणि सेवांचा लाभ भारतभरातील प्रत्येक कुटुंबाला मिळावा याची खातरजमा करण्याच्या उद्देशाने टाटा स्कायने हे पाऊल उचलले आहे.

नव्या किंमतीतील सेट टॉप बॉक्स आता भारतातील सर्व शहरे आणि गावांमधील स्थानिक वितरक आणि रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना विविध टेलर-मेड (गरजांनुरूप तयार केलेले) पॅक्स, अ-ला-कार्टे वाहिन्या आणि बंडल्ड कॉम्बो उपलब्ध आहेत. शिवाय, यात त्यांना हव्या त्या वाहिन्या घेण्याची किंवा नाकारण्याचीही सोय आहे.

टाटा स्कायने ग्राहकसेवा (१२ भाषांमधील कॉल सेंटर्स), अग्रणी तंत्रज्ञान (रेकॉर्डर, फोर-के सेट टॉप बॉक्स, टाटा स्काय बिंज) आणि ६००हून अधिक वाहिन्या आणि सेवा देऊ करत सबस्क्राइबर्सना आनंदाचा ठेवा देऊन नवे मापदंड स्थापित केले आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search