Next
‘महिंद्रा’चे प्रगत ‘फोरडब्ल्यूडी’ ट्रॅक्टर महाराष्ट्रात दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 03:19 PM
15 0 0
Share this storyपुणे : महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) महाराष्ट्रात आपल्या नोवो युवो व जिवो ब्रँडची फोर व्हील ड्राइव्ह (फोरडब्लूडी) रेंज दाखल केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.

ट्रॅक्टरची किंमत आकर्षक असून, एक्स-महाराष्ट्र ११.५ लाख रुपयांपासून नोवो ६५ एचपी फोरडब्लूडी, ७.७ लाख रुपयांपासून युवो ४५ एचपी फोरडब्लूडी (५७५ डीआय) आणि ४.२१ लाख रुपयांपासून जिवो २४ एचपी फोरडब्लूडी (२४५ डीआय) उपलब्ध आहे. १५० कस्टमर टच पॉइंट्सच्या महिंद्राच्या विस्तृत जाळ्यामार्फत हे ट्रॅक्टर राज्यभर तातडीने उपलब्ध होणार आहेत.

फोर व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्यामुळे निसरड्या किंवा उंचसखल भूपृष्ठावर उत्तम ट्रॅक्शन मिळते व त्यामुळे उत्पादकता वाढते. सर्व ‘फोरडब्लूडी’ ट्रॅक्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जसे ‘DiGiSENSE’ आणि ही वैशिष्ट्ये कार्यामध्ये सोय व सुलभता आणण्याच्या दृष्टीने तयार केली आहेत; तसेच, शेतीच्या कामांसाठी उत्पादकता व कार्यक्षमतेतही वाढ केली जाणार आहे.

या प्रसंगी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मार्केटिंग, फर्म डिव्हिजनचे उपाध्यक्ष रवींद्र शहाणे म्हणाले, ‘महिंद्रामध्ये आम्ही प्रणेते शेती तंत्रज्ञान आणून ग्रामीण भागाच्या भरभराटीला चालना देत आहोत. या तंत्रज्ञानामुळे शाश्वत उत्पादकतेला चालना मिळेल व त्या बदल्यात, शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल. आमचे प्रगत ट्रॅक्टर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीच्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करण्याची सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी यशस्वी ठरले आहे.’

‘अद्ययावत ‘फोरडब्लूडी’ उत्पादने सादर करताना आम्हाला अतिशय आंनद होत असून, त्यामुळे या उद्योगात नवा बेंचमार्क निर्माण केला जाणार आहे. ‘फोरडब्लूडी’ प्रकार आता ट्रॅक्टर्सच्या नोवो, युवो व जिवो ब्रँडमध्ये उपलब्ध असून, त्यामुळे ऊस व फुलशेती अशा विविध प्रकारच्या पिकांना शेतीच्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत,’ असे शहाणे यांनी सांगितले.

जवळजवळ तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला नोवो ५०-६० एपी श्रेणीमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. महिंद्रा नोवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या ४० कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या कामांपर्यंत शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील.

दोन वर्षांपूर्वी दाखल केलेला युवो भारतातील झपाट्याने प्रगती करणारा ट्रॅक्टर ब्रँड ठरला आहे. पूर्णतः स्वतंत्र सुविधेवर तयार करण्यात आलेला आणि विशेष व या उद्योगातील पहिलावहिला १२एफ+थ्रीआर फुल कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्स समाविष्ट असलेला महिंद्रा युवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या ३० कामांसाठी केला जाऊ शकतो.

महिंद्रा जिवो हा अत्यंत वैविध्यपूर्ण ट्रॅक्टर असून, त्याचा वापर पिकांची निगा, जमिनीची मशागत व आंतरपिकांची कामे अशा निरनिराळ्या कामांसाठी करता येऊ शकतो. फुलशेती व रो क्रॉप फार्मिंग या श्रेणींच्या नव्या गरजा विचारात घेऊन महिंद्रा जिवोची निर्मिती केली आहे आणि त्याची अरुंद व आटोपशीर रचना व उच्च बळ विचारात घेता तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल. ‘महिंद्रा’चा पहिला सब २५एचपी फोरडब्लूडी ट्रॅक्टर म्हणून, हा उच्च कामगिरी करणारा ट्रॅक्टर व या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क व इंधनक्षमता यामुळे तो या श्रेणीत आघाडीवर आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेला महिंद्रा नोवो विविध एचपी क्षमतांमध्ये (४९.९, ५२, ५७, ६५ व ७५ एचपी) उपलब्ध असून, तो सर्व प्रकारच्या वापरांमध्ये व मातीच्या स्थितीमध्ये किमान आरपीएम ड्रॉपसह सातत्यपूर्ण व एकसमान बळ देत राहील. ‘’

३०५ एनएम इतके सर्वोच्च टॉर्क व २८ टक्के बॅकअप टॉर्क असलेले अतिशय शक्तिशाली इंजिन, तीन रेंज लिव्हर्स व फुल सिंक्रोमेश ट्रान्समिशन, वेग १.७ किमी प्रति तास ते ३६ किमी प्रति तास (क्रीपर स्पीड ०.४ किमी तासापासून), २६०० किलो इतकी या श्रेणीतील सर्वाधिक क्षमता, झटपट लोअरिंगसाठी सर्वाधिक पंप फ्लो, ६५ एचपी व ७५ एचपी, मेटॅलिक डीप रेड पेंट, स्टाइलाइज्ड मेटॅलिक थ्रीडी डिकॅल ही नोवोची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link