Next
गदिमांच्या गीतांमधून उलगडले त्यांचे बालपण....
‘नाच रे मोरा’ला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद...
BOI
Thursday, October 04, 2018 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे संघर्षमय बालपण, त्यानंतर सिद्धहस्त लेखक, गीतकार होण्यापर्यंत झालेला त्यांचा प्रवास नाट्य संस्कार कला अकादमीच्या ‘नाच रे मोरा’ या कार्यक्रमात उलगडण्यात आला. गदिमांच्या बालपणावर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम त्यांनी लिहिलेल्या ‘नाच रे मोरा’, ‘झुक झुक अगीनगाडी’, ‘दादा मला एक वाहिनी आण’ अशा अविस्मरणीय गीतांवर आधारित होता. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी आणि श्रीधर माडगूळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चार गायिका आणि ३५ कलाकारांनी सादर केलेल्या ‘नाच रे मोरा’, ‘झुक झुक अगीनगाडी’, ‘दादा मला एक वाहिनी आण’ अशा विविध १५ गाण्यांवरील नृत्यरचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे लेखन गदिमा यांची नात लीनता माडगूळकर-आंबेकर यांनी केले होते. दिग्दर्शन अशोक आडावदकर यांचे, तर कार्यक्रमाची संकल्पना दिपाली निरगुडकर यांची होती. नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली. 

या वेळी मेधा कुलकर्णी म्हणाल्या,  ‘नाच रे मोरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या मनात गदिमांचे स्मारक नक्कीच तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात असे कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावे यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमीला शुभेच्छा.’

श्रीधर माडगूळकर म्हणाले, ‘ गदिमांचे बालपण,  त्यांचा लेखक, दिग्दर्शक असा झालेला प्रवास त्यांनी लिहिलेल्या कविता, गाण्यांच्या आधारे नृत्य आणि नाट्य स्वरूपात प्रथमच पाहण्यात आला. नाट्यसंस्कार कला अकादमीसारखी संस्था असे कार्यक्रम करून गदिमांच्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी नव्याने आजच्या तरुण पिढीसमोर आणत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. अशा कार्यक्रमाच्या पाठीमागे शासनाने खंबीरपणे तसेच आर्थिकदृष्टया पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search