Next
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टिगोर बझ’ची लिमिटेड एडिशन
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘टिगोर’ ही आटोपशीर सेदान श्रेणीची व्याख्या बदलून टाकणारी गाडी बाजारात येऊन एक वर्ष झाल्यानिमित्त, तसेच या गाडीला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ‘टाटा मोटर्स’ने ‘टिगोर बझ’ या लिमिटेड एडिशनची घोषणा केली. अधिक चांगल्या, क्रांतीकारी, विस्मयकारी आणि आरामदायी रचना असलेल्या या गाडीचे पेट्रोल व्हर्जन ५ लाख ६८ हजार रुपयांना, तर डिझेल व्हर्जन सहा लाख ५७ हजार रुपयांना (दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत) उपलब्ध आहे.

यामध्ये अॅक्सेसरी किटचाही समावेश आहे. ‘टिगोर बझ’ मॅन्युअल ट्रान्समिशन अर्थात एमटीने युक्त असून, एक्सटी ट्रिमवर आधारित आहे. १३ जूनपासून ही गाडी देशभरातील सर्व डीलर्सकडे उपलब्ध होईल.

अनावरणाच्या वेळी टाटा मोटर्समधील प्रवासी वाहने व्यवसाय युनिटच्या मार्केटिंग, विक्री आणि ग्राहकसेवा विभागाचे प्रमुख एस. एन. बर्मन म्हणाले, ‘टाटामध्ये आम्ही ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करून नियमितपणे नवीन उत्पादने व वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात आणले आहेत. काहीतरी अनपेक्षित असे उत्पादन तयार करून नवीन प्रवाह निर्माण करण्याच्या आमच्या लौकिकाचे खरेखुरे प्रतिबिंब ‘टिगोर बझ’च्या या लिमिटेड एडिशनमध्ये उमटले आहे. डिझाइन, शैली आणि प्रवृत्ती यांचे तरुणाईला आवडेल असे मिश्रण ‘टिगोर’मध्ये आहे. पहिल्या वर्षात गाडीने चांगले यश मिळवले आहे. बाजारात आल्यापासून गाडीला असलेल्या दमदार मागणीच्या जोरावर आम्हाला महिन्यागणिक वाढ साधता आली आहे. ही वाढ आणि ग्राहकांचे समाधान या दिशेने ‘टिगोर बझ’च्या रूपाने आणखी एक पाऊल टाकण्यास आम्ही उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link