Next
समूहगीत स्पर्धेत मुक्तांगण, भावे शाळा विजयी
BOI
Monday, August 05, 2019 | 02:38 PM
15 0 0
Share this article:

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत शिक्षक गटात प्रथम आलेल्या म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या संघाला पारितोषिक देताना नंदकुमार काकिर्डे

पुणे : भारतीय विद्या भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरातर्फे आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत विद्यार्थी गटात मुक्तांगण प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला, तर शिक्षकांसाठीच्या गटामध्ये भावे प्राथमिक शाळेने पहिला क्रमांक मिळविला.

या स्पर्धेतील विद्यार्थी गटात दुसरा क्रमांक बालशिक्षण मंदिर, तर तृतीय क्रमांक पवार पब्लिक स्कूलने मिळविला. शिक्षकांच्या गटातील दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पी. इ. एस. मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल व एन. सी. एल. प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांनी पटकावला.

भजन, प्रार्थना व स्वागतगीत हा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेत शहरातील एकूण १५ शाळांनी भाग घेतला होता. विविध संघांनी मराठी, तसेच हिंदी भाषांमधील गीते सादर केली. या स्पर्धेसाठी पं. मुकुंद मराठे व शुभांगी मुळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ भवनचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुलोचना नातू विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती सचदेव, रत्ना साहा, संगीत शिक्षक योगेश कुलकर्णी, केदार तळणीकर यांनी विशेष प्रयत्न केले. 

स्पर्धेचे सूत्रसंचालन वैशाली गोखले व गायत्री गुमास्ते यांनी केले. गेल्या १० वर्षांपासून या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search