Next
स्वमग्न मुलांच्या कलाविष्कारांचे प्रदर्शन
BOI
Thursday, March 29, 2018 | 01:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : दोन एप्रिल रोजी असलेल्या जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्ताने (वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे) त्याच दिवशी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू, त्यांनी काढलेली चित्रे यांच्यासह त्यांच्या कलेचे विविध आविष्कार त्या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

‘दर वर्षी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. स्वमग्न मुलांच्या कलाकृती पाहण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. स्वमग्नतेबाबत जागरूकता निर्माण करणारे ‘टी-शर्टस्’देखील प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असलेले हे टी-शर्टस् खरेदी करून आपणही स्वमग्न मुलांच्या विकासाला हातभार लावू शकता आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करू शकता.,’ असे आवाहन प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांनी केले आहे.

पद्मजा गोडबोले यांनी १८ वर्षांपूर्वी प्रसन्न ऑटिझम सेंटरची स्थापना केली. कोणत्याही सरकारी मदतीविना आजही हे केंद्र चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रयत्नांना समाजाने हातभार लावण्याची गरज आहे.

प्रदर्शनाबद्दल :
दिवस : सोमवार, दोन एप्रिल २०१८
वेळ : सकाळी १० ते दुपारी तीन
स्थळ : प्रसन्न ऑटिझम सेंटर, ८९५, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, पुणे

(गेल्या वर्षीच्या प्रदर्शनाची झलक पाहा https://goo.gl/zai3W8 या लिंकवर.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search