Next
‘कामगारांसाठी ‘सीएमएआय’चा पुढाकार कौतुकास्पद’
प्रेस रिलीज
Monday, September 10, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘व्यापार, उद्योगाच्या विकासात कामगारांचा वाटा मोलाचा असतो. या कामगारांना जपले, तर उद्योगाची वाढ चांगली होते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याकडे कंपन्यांनी आणि उद्योजकांनी लक्ष द्यायला हवे. ‘सीएमएआय’ने आपल्या कामगारांच्या आरोग्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन नगरसेवक आणि पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केले.

‘नेत्रदान ही काळाची गरज असून, आपण नेत्रदान जागृतीसाठी काम करावे, तसेच पालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य देण्यासह एकत्रित कार्यक्रम राबवू,’ असे चोरबेले यांनी या वेळी नमूद केले.

दी क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएमएआय) पश्‍चिम विभागातर्फे आणि ससून रुग्णालयाच्या सहकार्याने स्वारगेटजवळील आनंद मंगल कार्यालय येथे कापड उद्योगातील कामगारांसाठी दोन दिवसांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चोरबेले बोलत होते. या वेळी ‘सीएमएआय’च्या सीएसआर कमिटीचे प्रमुख व्ही. एम. कुलकर्णी, चेअरमन जयंती वीरा, मानद सचिव राजीव आगरवाल, विभागीय सचिव राजाभाऊ महाडिक आदी उपस्थित होते.

‘दोन दिवसांच्या या शिबिरात ७०० ते ८०० लोकांची नेत्र तपासणी व गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले. तपासणीअंती आवश्यकता असल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. ‘सीएमएआय’ भारतीय कापड उद्योगातील महत्त्वाची असोसिएशन असून, १९६२पासून ती कार्यरत आहे. कापड निर्माते, निर्यातदार, व्यावसायिक आदी या संस्थेचे सभासद असून, २० हजार कंपन्या सीएमएआयशी निगडित आहेत,’ असे राजीव अगरवाल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search