Next
‘लेग्रांड’तर्फे ‘एसीबी’ची नवी श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 11:16 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या ‘लेग्रांड’तर्फे एअर सर्किट ब्रेकर्स अर्थात ‘एसीबी’ची डीएमएक्स एसपी ही नवी श्रेणी बाजारात सादर करण्यात आली आहे. सिन्नर, नाशिक येथील कंपनीच्या असेंब्ली लाइनवर ती तयार करण्यात आली आहे.

डीएमएक्स एसपीच्या नव्या श्रेणीला अधिक जास्त सुरक्षितता तसेच अधिक सक्षम मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दणकटपणा या फायद्यांची जोड देण्यात आली आहे. व्यावसायिक, निवासी, मध्यम उदयोग, रुग्णालये, मॉल्स आणि हॉटेल्स यासारख्या सर्वच क्षेत्रात डीएमएक्स एसपीची नवी श्रेणी लाभदायक ठरणार आहे.

वर्ष २००२ पासून ‘लेग्रांड’ समूह भारतातील ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर राहिलेला आहे. कंपनीची एसीबी, एमसीसीबी, बसबार्स, कॅपॅसीटर, कंट्रोल गिअर आणि मॉड्युलर उपकरणांची मालिका भारतात अल्पावधीत नावाजली गेली आहे. एसीबी विकसनासाठी सुरू करण्यात आलेल्या सिन्नर येथील नवीन असेंब्ली लाइनद्वारा ‘मेक इन इंडिया’ उपक्रम आणि एकूण ऊर्जा क्षेत्राबाबत असलेली आपली बांधिलकी यांना आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी लेग्रांड इंडिया सज्ज झाली आहे. ‘लेग्रांड’चे जगभरात एकूण ९० देशांत उत्पादन प्रकल्प असून, त्यापैकी १५ प्रकल्प भारतात आहेत.

डीएमएक्स एसपी एसीबी भारतीय नियामक गुणवत्ता निकषांचे संपूर्णतः पालन करणारे आहेत. ६३०ए पासून ते २५००ए एवढ्या श्रेणीमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी तसेच इलेक्ट्रिकल उपकरणांच्या जोडणीला अधिक विस्तारित सुरक्षितता पुरविण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैशिष्ट्यांसह हे एसीबी अतिशय विचारपूर्वक बनविण्यात आले आहेत.

या निमित्ताने बोलताना लेग्रांड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिन चार्ल्स थॉर्ड म्हणाले, ‘आमच्या सिन्नर, नाशिक येथील प्रकल्पातील नवीन असेंब्ली लाइनमधून डीएमएक्स एसपी एसीबीचे उत्पादन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. लग्रों इंडियाने कायमच ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे आणि या सादरीकरणाच्या माध्यमातून आम्ही या मोहिमेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. भारत ही ‘लेग्रांड’ समूहातील चौथ्या क्रमांकाची मोठी उपकंपनी आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘डीएमएक्स एसपीची नवी श्रेणी अधिक अनुकूल, संयुक्तिक, स्मार्ट आणि कार्यक्षम आहे. भारतीय बाजारपेठेची पुरेपूर यथास्थित जाण लक्षात घेऊनच हे एसीबी विकसित करण्यात आलेले आहेत आणि समूहाच्या परंपरेचा लाभ घेत भारतात आरेखित झालेली ही नवी श्रेणी सादर करण्याची संधी आम्ही घेत आहोत.’

लेग्रांड इंडियाचे संचालक (विपणन) समीर सक्सेना म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांसाठी एसीबीची नवी श्रेणी सादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. विजेची बचत करण्यासाठी आणि अतिशय कार्यक्षमपणे काम करण्यासाठी हे उत्पादन विकसित करण्यात आलेले आहे. सिन्नर, नाशिक येथील आमच्या कारखान्यात निर्माण झालेल्या या डीएमएक्स एसपी एसीबीमुळे ग्राहकांच्या गरजांकडे लक्ष पुरविणे आणि त्यांच्या मागण्यांवर अधिक भर देणे आम्हाला शक्य होणार आहे.’

‘लेग्रांड’ ही इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी असून, तिची उलाढाल ५.५ अब्ज युरो इतकी आहे. भारतीय बाजारपेठेत प्रिमियम वायरिंग उपकरणांच्या तसेच एमसीबी उपकरण क्षेत्रात कंपनीचे वर्चस्व आहे. भारतीय बाजारपेठेबाबत असलेली सखोल जाण आणि समूहाची परंपरा यांचा सुयोग्य लाभ घेत लेग्रांड इंडियाने भारतासाठी भारतात आरेखित केलेली एसीबीची नवी श्रेणी सादर केली आहे. या सादरीकरणाद्वारे लेग्रांड इंडियाचे उर्जा क्षेत्रातील स्थान अधिक सक्षम होण्यास सहाय्य होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search