Next
डॉ. नीलेश साबळेंना राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर
BOI
Wednesday, July 03, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील राम नगरकर कला अकादमीतर्फे दिला जाणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार या वर्षी प्रसिद्ध सूत्रसंचालक, लेखक, दिग्दर्शक व विनोदी अभिनेता डॉ. नीलेश साबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण पाच जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नव्या पेठेतील पत्रकार भवनात केले जाणार आहे.

राम नगरकर यांनी आपल्या कारकिर्दीत रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात एक हरहुन्नरी कलाकार म्हणून आपले खास मानाचे स्थान मिळविले होते. त्यांची ही विनोदाची परंपरा, कला क्षेत्रात पुढे नेणाऱ्या विनोदी कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार प्रसिद्ध विनोदी अभिनेते भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम यांना देण्यात आला आहे. 

हा पुरस्कार ज्येष्ठ लेखक व सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असून, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि लीड मीडियाचे फाउंडर डायरेक्टर विनोद सातव उपस्थित राहणार आहेत. या वेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष वंदन राम नगरकर, उदय राम नगरकर, संध्या नगरकर-वाघमारे, मंदा नगरकर-हेगडे यांनी केले आहे. संतोष चोरडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : शुक्रवार, पाच जुलै २०१९ 
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता 
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search