Next
पुणे येथे संगीत मैफलीचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 04:40 PM
15 0 0
Share this story

उस्ताद अल्लारखाँपुणे : तबलावादन, बासरीवादन आणि शास्त्रीय गायनाची अवीट गोडीची मैफल पुणेकर रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. तंतूवाद्य वादनास तबल्याची संगत करताना आपल्या अद्वितीय शैलीने तबलावादकाचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ कलाकार उस्ताद अल्लारखाँ यांच्या जयंतीनिमित्त ‘सा’ व ‘नी’ सूरसंगीत या संस्थेने या मैफलीचे आयोजन केले आहे. ही मैफल २९ एप्रिलला सांयकाळी सहा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे होणार असून, ती सर्वांसाठी विनामूल्य आहे.   

‘सा’ व ‘नी’ सूरसंगीत संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी ही माहिती दिली. तालयोगी पं. सुरेश तळवलकर, सत्यजित तळवलकर आणि सावनी तळवलकर यांचे एकत्रित तबलावादन हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. यांना हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी व गायनातून नागेश आडगांवकर संगत करणार आहेत. हा त्रिवेणी संगम पुणेकरांना प्रथमच अनुभवण्यास मिळणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी याचे बासरीवादन होणार आहे.

सध्याचे एक आघाडीचे तबलावादक म्हणून ओळखले जाणारे ओजस आधीया हे त्यांना तबल्याची संगत करणार आहेत. तरुण उदयोन्मुख शास्त्रीय गायक गंधार देशपांडे यांचे शास्त्रीय गायनही होणार असून, त्यांना स्वप्नील भिसे हे तबल्याची व मिलिंद कुलकर्णी हार्मोनियमची संगत करणार  आहेत. या कार्यक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज आणि सारस्वत बँकेने प्रायोजक म्हणून साहाय्य केले आहे .

उस्ताद अल्लारखाँ यांच्याबद्दल बोलताना मोहिते म्हणाले, ‘पं. रवीशंकर आणि उस्ताद अल्लारखाँ यांनी १९५० व ६० या दशकात भारतात आणि परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अल्लारखाँ यांनी सतार, सरोद यांसारख्या वाद्यांबरोबर तबल्याची संगत वेगळ्या पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तबलावादकाचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. मुख्य कलाकाराने मांडलेला सांगीतिक विषय आपल्या तबलावादनातून पुढे घेऊन जायची पद्धत त्यांनी सुरू केली आणि पुढे नेली.’

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, २९ एप्रिल २०१८
वेळ : सांयकाळी सहा वाजता
स्थळ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link