कोलकाता : आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येणाऱ्या गुणवान विदयार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘मॅग्मा फिनकॉर्प लि.’ने यंदाही ‘एम स्कॉलर’ हा शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम चालवण्यात येत असून, आतापर्यंत मॅग्माने दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.
याबाबत मॅग्मा फिनकॉर्प लि.च्या सीएसआर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व अॅडमिन विभागाचे उपाध्यक्ष कौशिक सिन्हा म्हणाले, ‘या वर्षीची एम-स्कॉलरची नवी बॅच जाहीर करताना मॅग्माला अतिशय आनंद होत आहे. एम स्कॉलर वंचित कुटुंबांतील दोनशे गुणवान विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी मदत करत आहे. आता आणखी नवीन विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे.’
‘भारतात तरुणांची संख्या लक्षणीय असून, त्यांना प्रगती करायची आहे. भारतात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मोफत असले, तरी घरची आर्थिक-सामाजिक स्थिती हालाखीची असल्याने असंख्य विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे दिसून येते. शाळा सोडण्याची मुख्य कारणे गरिबी, गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधीचा अभाव व देशाच्या एकाकी भागांत अपुऱ्या पायाभूत सुविधा ही आहेत. यामुळे हुशार व गुणवान असलेल्या विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळा किंवा कॉलेज सोडावे लागते. हे लक्षात घेऊन मॅग्माने २०१५ पासून ‘एम-स्कॉलर’ या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यास सुरूवात केली आहे. ‘छोट्यातल्या छोट्या स्वप्नासाठी गुंतवणूक करणे’ हे ब्रीद अवलंबत कंपनीने हा उपक्रम राबवला आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक कामगिरीनुसार व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीनुसार केली जाते. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाखेतील तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. इंजिनीअरिंग, मेडिकल, लॉ अशा व्यावसायिक, विशेष अभ्यासक्रमांसाठी चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल’,असे कौशिक सिन्हा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,‘शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत. यासाठी विद्यार्थी भारताचा नागरिक असायला हवा. अर्जदाराचे जास्तीत जास्त वय १५ ऑगस्ट २०१८ रोजी, २० वर्षे असावे. अर्जदाराने संबंधित स्टेट बोर्ड परीक्षेत (बारावी) किमान ८० टक्के गुण मिळवलेले असावेत. कुटूंबाचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्जासोबत बारावीच्या मार्कशीटची अटेस्टेड प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, वयाचा पुरावा (शालेय प्रमाणपत्र/अॅडमिन कार्ड), पत्त्याचा पुरावा व ओळखीचा पुरावा, पालकांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, कॉलेज प्रवेशाचा पुरावा (पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी), बँक खात्याचा तपशील, शाळेकडून कॅरॅक्टर सर्टिफिकेट ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.’
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे मॅग्मा फिनकॉर्प लि.च्या कार्यालयात पाठवावे.
अर्ज करण्यासाठी पत्ता:
कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभाग
मॅग्मा फिनकॉर्प लि.,मॅग्मा हाउस, दहावा मजला, २४ पार्क स्ट्रीट, कोलकाता – ७०००१६,पश्चिम बंगाल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
दूरध्वनी : ७०४४०३३७१४, (०३३) ४४०१७४६९.
इ-मेल : csr@magma.co.in
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५