Next
डॉ. विद्या अवसरे यांचे पुण्यात व्याख्यान
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 02:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे धुरापासून इंधन बनविण्यासाठी लागणाऱ्या संप्रेरकांचा शोध घेणाऱ्या डॉ. विद्या अवसरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यातील पत्रकार भवनात होणार असून, सर्वांसाठी विनामूल्य आहे.

या विषयी माहिती देताना विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र. म्हणाले, ‘आपल्याला काही माणसे अशी दिसतात जी कामं करून नामानिराळे राहतात. ‘नेकी कर और दारिया मे फेक’ अशी त्यांची वृत्ती असते. काही रसायनेसुद्धा अशीच असतात. रासायनिक क्रियेत भाग घेतात, पण स्वतः पुन्हा स्वतंत्र होत मूळ पदावर जातात. अशा रसायनांना संप्रेरके म्हणतात. संप्रेरकांचा वापर करून अनेक अशक्य रासायनिक क्रिया शक्य करता येतात. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात कार्बन डायॉक्सिड वायू असतो. त्यापासून पुन्हा मिथेनॉलसारखी इंधन बनवता येतात. पाण्यापासून हायड्रोजन बनविण्याची क्रिया सोपी होते. अशा संप्रेरकांचा शोध घेणाऱ्या डॉ. विद्या अवसरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.’

व्याख्यानाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
स्थळ : पत्रकार भवन, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link