Next
श्रीस्कंदपुराणांतर्गत श्रीकृष्णामाहात्म्यम्
BOI
Monday, September 03, 2018 | 09:46 AM
15 0 0
Share this article:

डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख यांनी ‘श्रीस्कंदपुराणांतर्गत श्रीकृष्णामाहात्म्यम्’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद संपादित केला आहे.

श्री कृष्णा नदीचे माहात्म्य महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील जनतेला सुपरिचित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेतील गंगा नदी प्रमाणे दक्षिणेतील कावेरी कृष्णा या नद्याही गंगेप्रमाणे पवित्र व मोठ्या मानल्या जातात. नद्यांचे उगम स्थान दोन किंवा त्याहून अधिक नद्यांचा संगम असणारी ठिकाणे आहेत त्यांना तीर्थस्थाने म्हटली जातात. या स्कंदपुराणांतर्गत कृष्णा नदीचे माहात्म्य हे महाराष्ट्रीय समाजाला परिचित आहे. श्रीकृष्णामाहात्म्यमध्ये साठ अध्याय असून, श्री कृष्णा नदी साक्षात विष्णूपासून निर्माण झाली असल्याने तिचे महत्त्व गंगानदीपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. कृष्णा, वेण्णा, पंचगंगा यांसारख्या अनेक नद्या कृष्णेला येऊन मिळतात.

या ग्रंथांमध्ये अनेक कथा सांगताना उपकथा तीर्थक्षेत्रांचे वर्णन जागोजागी आलेले आहे. अनेक उपासना आणि व्रतांची माहिती दिली गेली आहे. त्याचप्रमाणे करणा तीर्थ वर्णन,  मंजिरी तीर्थ वर्णन, भुता तीर्थ वर्णन, भीमकुंड तीर्थ वर्णन त्याचप्रमाणे नारद आणि ऋषी यांचा संवाद, भृगु-ब्राह्मण संवाद, स्कंद आणि नारद संवाद, याज्ञवल्क्य-भगीरथ संवाद याचे वर्णन आले आहे; तसेच पुण्यक्षेत्र, श्राद्ध, पिंडदान, नारायण नागबली, त्रिपिंडी यासारखा उल्लेख यामध्ये दिसून येतो. प्रत आचरणामुळे पापमुक्ती कशी होते? मोक्षदायक कोणती कृत्ये आहेत? याचेही वर्णन या ग्रंथांमध्ये आढळून येते.

श्रीपाद श्रीवल्लभ तसेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांनाही कृष्णा नदीचे माहात्म्य माहिती असल्याने त्यांचे सेवाकार्य कृष्णानदीच्या तीरावर प्रकर्षाने दिसून येते. कुरुगड्डी येरे पावसा येथील श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान, तसेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे औदुंबर, नरसिंह वाडी, श्री शैल्यम यांसारखी तीर्थस्थाने त्यांच्या पावन वास्तव्याने पुनीत झाली आहेत यावरून दत्त संप्रदायामध्ये या नदीचे माहात्म्य अवर्णनीय आहे. श्रद्धाळू व मुमुक्षु लोकांनी या ग्रंथाचे वाचन एकदा तरी करावे इतके त्याचे कार्य महान आहे.

या ग्रंथाला पुणे विद्यापीठाच्या संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागप्रमुख डॉ. शैलजा कात्रे यांची अभ्यासू व महनीय प्रस्तावना लाभली आहे. त्याचप्रमाणे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य शृंगेरी पिठाचे भारतीतीर्थ स्वामी यांचे आशीर्वाद या ग्रंथास लाभले आहे.

प्रकाशक : गजानन नारायण कोडणीकर
पाने : ४७९  
किंमत : २०० रुपये
संपर्क : गजानन कोडणीकर (०९९६९० २३२१२)
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search