Next
‘टीसीएस’तर्फे ‘फिटफॉरलाइफ कॉर्पोरेट चॅलेंज’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, January 04, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन्स कंपनीतर्फे ‘टीसीएस फिटफॉरलाइफ कॉर्पोरेट चॅलेंज २०१८-१९’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा पुणे, कोलकाता आणि कोची या शहरांमध्ये अनुक्रमे सहा जानेवारी, १३ जानेवारी आणि १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होईल.

‘टीसीएस फिटफॉरलाइफ कॉर्पोरेट चॅलेंज’ म्हणजे व्यावसायिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन आणि सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी समविचारी कंपन्यांनी एकत्र येऊन चालवलेला उपक्रम आहे. याची सुरुवात नऊ डिसेंबर २०१८ला अहमदाबाद येथे झाली. ३०० कंपन्यांतील एकूण १२ हजार धावपटूंनी या चॅलेंजमध्ये प्रत्येक वर्षी भाग घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी कंपन्यांना एक संघ म्हणून या स्पर्धेसाठी नोंदणी करावी लागते. प्रत्येक संघात किमान चार स्पर्धक असावे लागतात. यात एक स्त्री असल्यास प्राधान्य दिले जाते. एक कंपनी अनेक संघ स्पर्धेत उतरवू शकते. प्रत्येक शहरांतून जास्तीत-जास्त तीन हजार स्पर्धकांना नोंदणी करता येते.

प्रत्येक शहरातील पहिल्या तीन क्रमांकप्राप्त स्त्री व पुरुष स्पर्धकांना ट्रॉफी, पदके, फास्ट्रॅक अॅक्टिव्हिटी ट्रॅकर्स आणि टाटा स्ट्रायडर सायकल्स दिल्या जातील. प्रत्येक शहरातील या आघाडीच्या सहा स्पर्धकांना (वेळेची पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या) टाटा मुंबई मॅरेथॉन किंवा टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये खुला प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, सर्वाधिक स्पर्धक असलेल्या कंपन्यांना, तसेच सर्वाधिक स्त्री स्पर्धक उतरवणाऱ्या कंपन्यांना ट्रॉफीज प्रदान केल्या जातील. प्रत्येक स्पर्धकाला रनर्स किट दिले जाईल. यामध्ये टीशर्ट व बॅगचा समावेश असेल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला पदक व टायमिंग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

‘टीसीएस’ने अहमदाबादमध्ये अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन, पुण्यात माहेर, कोलकात्यात टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट आणि कोचीमध्ये कँक्युर फाउंडेशन यांच्याशी या चॅलेंजसाठी भागीदारी केली आहे. या प्रत्येक चॅरिटी पार्टनरला ‘टीसीएस’कडून पाच लाखांचे योगदान दिले जाणार आहे.

या विषयी बोलताना ‘टीसीएस’चे मुख्य मार्केटिंग अधिकारी रवी विश्वनाथन म्हणाले, ‘टीसीएसच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाने कायमच लक्ष केंद्रित केले आहे. अंतर्गत उपक्रम, तसेच जगातील सर्वात मोठ्या रनिंग इव्हेंट्सचे प्रायोजकत्व या माध्यमातून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आणि जगभरातील समुदायांना तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहोत. फिटफॉरलाइफ कॉर्पोरेट चॅलेंजच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यावसायिकांनी धावण्याचा व्यायाम करण्यासाठी व स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search