Next
‘सामुदायिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, February 19, 2019 | 03:09 PM
15 0 0
Share this storyठाणे : ‘सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना असून, त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल, आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही नातेवाईक म्हणून सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार १०१ जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी भावली धरणातील पाण्यासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्याने दूर करण्यात येतील असेही सांगितले.

खासदार कपिल पाटील फाउंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे १ हजार १०१  एक आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद दिल्यामुळे नवविवाहित जोडप्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी या वेळी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून व शिवछत्रपती महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.‘आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचा निषेध करून आपला देश या भ्याड कृत्याचा निश्चित बदला घेईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. ते म्हणाले, ‘भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे, याबाबतीत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जाईल. पेसा कायद्यातील काही तरतुदींमुळे आदिवासी-गैर आदिवासींमध्ये विनाकारण वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हायला हवेत. आदिवासी समाजाने जल-जमीन-जंगल खऱ्या अर्थाने टिकविले, आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. वधु-वरांना आपल्या आयुष्यातील विवाहाच्या या मंगलप्रसंगाची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे मी आज फार भाषण करणार नाही.’विवाह सोहळा सुरू झाल्यावर मुख्यमंत्री आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी विवाह सोहळ्यातील जोडप्यांवर मंगलाष्टका वाहिल्या व सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच जोडप्यांना मंगळसूत्र, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस, तसेच जिंदाल कंपनीतर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री शिंदे यांनी भावली धरणातून लवकरात लवकर शहापूर परिसरास पाणी मिळण्याची मागणी केली. विदर्भ व मराठवाड्यातदेखील सामूहिक विवाहाच्या माध्यमातून अनेक लग्ने लावण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने कन्यादान योजनेत अनेक गरीब शेतकरी व कुटुंबांना आधार दिल्याचेही त्यांनी सांगितले.‘शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे घरी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली, तरीही लग्नासारख्या सोहळ्यावर कर्ज काढून खर्च करण्याची हौस आदिवासी समाजातील अनेकांसाठी पुढील आयुष्यात अडचणीची ठरली आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात व्यतित केल्याने आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अपेक्षित प्रगती साधता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदू सेवा संघ आणि खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केले आहे,’ असे खासदार पाटील म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link