Next
‘नागरिक हे साध्या वेषातील पोलिसच’
अधीक्षक सुषमा चव्हाण यांचे मत
BOI
Tuesday, July 16, 2019 | 05:36 PM
15 0 0
Share this article:

करम प्रतिष्ठानच्या वतीने ‘शहरी महिला सुरक्षा’ या विषयावर झालेल्या कार्यक्रमात प्रज्ञा महाजन, अधीक्षक सुषमा चव्हाण, सुप्रिया जाधव व भूषण कटककर

पुणे : ‘शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सज्ज आहे. दामिनी पथक, मार्शल, भरोसा सेल, पोलीस दीदी यासारख्या अनेक प्रभावी योजना राबवल्या जात आहेत;मात्र महिलांनीही काळजीपूर्वक वावरणे व गुन्हा घडत आहे हे लक्षात येताच तत्काळ प्रखर विरोध करणे ही गुन्हा रोखण्याची पहिली पायरी आहे. सामान्य नागरिकांनीही सजग राहून पोलिसांच्या कार्यात मदत होईल हे बघणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने साध्या वेषातील पोलिसाची भूमिका घेण्याची वृत्ती जोपासली, तर गुन्ह्यांची शक्यता जवळपास नष्ट होऊ शकेल,’ असे मत अप्पर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी व्यक्त केले.
 
करम प्रतिष्ठानच्या वतीने ‘शहरी महिला सुरक्षा’ या विषयावर झालेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. प्रज्ञा महाजन व सुप्रिया जाधव यांनी मुलाखत घेतली. या वेळी करम प्रतिष्ठानचे भूषण कटककर उपस्थित होते.
 
चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘समाजाने निर्माण केलेल्या विविध सुरक्षा यंत्रणांपैकी आपले कुटुंबीय व स्नेही ही पहिली यंत्रणा आहे. महिलांनी कुटुंबियांना विश्वासात घेऊन आपल्या समस्या व्यक्त करायला हव्यात.फ्लॅट संस्कृतीमुळे आजूबाजूला होणाऱ्या गुन्हेगारी घटनांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती फोफावत आहे व हे घातक आहे. पोलिस दलाकडून महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे’.

 

या वेळी भूषण कटककर म्हणाले, ‘तंत्रज्ञानामुळे आलेल्या पारदर्शकतेमुळे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याचे व त्यामुळे शहरी गुन्हे घटण्याचे प्रमाण वाढले आहे;मात्र हा लाभ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोचणे आवश्यक आहे.’
 
कार्यक्रमादरम्यान महिला सुरक्षिततेविषयी कार्य करणाऱ्या दहा महिलांचे सत्कार करण्यात आले.
 
दुसऱ्या सत्रात झालेल्या निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सुप्रिया जाधव, स्वाती सामक, प्राजक्ता पटवर्धन, नूतन शेटे, आरुषी दाते, सुजाता पवार व चिन्मयी चिटणीस यांनी कविता सादर केल्या. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search