Next
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘झूमकार’तर्फे ‘इटूओ-प्लस’ ऑफर
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this storyपुणे : महिंद्रा उद्योग समुहातील ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘झूमकार’ यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्याची घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची ५० वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’ व ‘झॅप’ योजना या दोन्ही पद्धतीने ही वाहने नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

कोणतेही डाउनपेमेंट, विमा व इतर सेवा यांच्यासाठी पैसे न मोजता महिन्याकाठी केवळ नऊ हजार ९९९ रुपये भरून ग्राहकांना ‘इटूओ-प्लस’ ही कार ‘झॅप सबस्क्राइब’ पद्धतीने वापरायला मिळते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (पीएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत या मोटारींना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाने २०३०या वर्षीपर्यंत देशात सर्वत्र विद्युत वाहनांच्या प्रसाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगाने ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’ यांनी हा उपक्रम राबविला आहे. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असल्याने, तसेच आयटी क्षेत्रातील मोठे केंद्र बनले असल्याने या शहरात योजनेचा शुभारंभ करण्याचे ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’ यांनी ठरविले.

या प्रसंगी बोलताना’ महिंद्रा इलेक्ट्रिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘अधिकाधिक नागरिकांना विद्युत मोटारींची सेवा मिळावी, या उद्देशाला ‘महिंद्रा इलेक्ट्रीक’ आणि ‘झूमकार’ या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हातभार लावत आहेत. पुण्यात ‘झूमकार’च्या ‘शेअर्ड मोबिलिटी’साठी आमच्या विद्युत मोटारी उपलब्ध करून देऊन आम्ही त्या प्रथमच सादर करीत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात विद्युत मोटारींच्या धोरणाची घोषणा झाल्यानंतरचा हा पहिलाच उपक्रम आहे. विद्युत वाहनांचा जलद गतीने प्रसार व्हावा, या महाराष्ट्र राज्याच्या ध्येयात आम्ही सहभागी आहोत.’

‘झूमकार’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन या प्रसंगी म्हणाले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबर पुन्हा एकदा सहभागी होण्यात आणि पुणेकरांना नाविन्यपूर्ण योजनेद्वारे पर्यावरणपूरक अशी सेवा देण्यात आम्हाला आनंद वाटतो. प्रथम आमची ‘पीईडीएल’ सायकल सेवा आणि आता आमचे विद्युत वाहन स्वीकारून पुणे शहराने मोबिलीटी क्षेत्रातील नव्या योजना राबविण्यात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.’

‘झूमकार’ व ‘लीजप्लॅन’ या दोन कंपन्यांच्या अर्थसाह्यातून हा पुण्यातील उपक्रम उभा राहात आहे. महिंद्रा फायनान्स या कंपनीद्वारे या उपक्रमाला इतर शहरांमध्ये अर्थसाह्य देण्यात येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link