Next
र्‍हिदम वाघोलीकर यांना पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 11:17 AM
15 0 0
Share this story

पुणे : संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द इअर २०१८’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

​येथील ग्रँड हयात ​येथे ​२३ जुलै ​रोजी झालेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते वाघोलीकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सुधीर वाघोलीकर, ​अनु वाघोलीकर, प्रतीक रोकडे, अविनाश गवई उपस्थित होते.  

वाघोलीकर हे पुण्यातील २४ वर्षीय युवा लेखक असून, त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. ‘स्वरलता-रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी’ हे ​लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते; तसेच किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिंग व्हॉइस- गानसरस्वती किशोरी आमोणकर’ हे ​पुस्तक ‘स्वरमंङळ’ (इंडियन हार्प) आकारात ​छापण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link