Next
‘डीकेटीई’च्या पदवी कोर्सेसना ‘एनबीए’चे मानांकन
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

इचलकरंजी : नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशनच्या (एनबीए) उच्च पदस्थ समितीने ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकविण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग कोर्सेसना मानांकन घोषित केले आहे. ‘एनबीए’ ही कॉलेजेसना मानांकन देणारी स्वायत्त संस्था आहे. यांच्यातर्फे शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तापूर्ण दर्जा तपासणीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया राबविली जाते.

‘एनबीए’ने दिलेल्या मानांकनाला देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. ‘एनबीए’ मानांकनामुळे विद्यार्थी, पालक, इंडस्ट्रीज व एकूण समाजालाच उत्कृष्ट शिक्षणांची हमी मिळत असते. ‘एनबीए’ समितीत भारतातील विविध नामांकित विद्यापीठ व संस्थेतील ११ ते १२ तज्ज्ञांची समिती महाविद्यालयाच्या तपासणीसाठी येते. हे मानांकन मिळविण्यासाठी इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक कार्य, संशोधनात्मक कार्य आणि औद्योगिक क्षेत्रासंबंधी उच्च पातळीवरचे कार्य असणे गरजेचे आहे.

या मानांकनासाठी आउटकम बेसड एज्युकेशन सिस्टीम राबवणे गरजेचे आहे. ही सिस्टीम ‘डीकेटीई’मधे राबविली जात असून, ‘डीकेटीई’मध्ये असलेली अद्यायावत प्रयोगशाळा, उत्तम प्लेसमेंटचे रेकॉर्ड एकंदरीत उच्च शैक्षणिक दर्जा या सर्वांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. ‘एनबीए’ मानांकनामध्ये टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, मॅनमेड टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल केमिस्ट्री, टेक्स्टाइल प्लॅंट इंजिनीअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी व इंजिनीअरिंगचे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इटीसी व आयटी एकूण नऊ कोर्सेसना मानांकन दिले आहे.

‘एनबीए’कडून उच्चपदस्थ समितीने नुकतीच संस्थेस भेट दिली व प्रत्येक अभ्यासक्रमांचे काटेकोरपणे मूल्यांकन केले. या भेटीमध्ये संस्थेतील अभ्यासक्रमातील घटक, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, सल्ला आणि विस्तार कार्य, पायाभूत सुविधा आणि शिक्षण, विद्यार्थी सहभाग समर्थन आणि प्रगती, प्रशासन नेतृत्व आणि व्यवस्थापन, नवीन उपक्रम आणि पद्धती या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी करण्यात आली; तसेच संस्थेचे सर्व सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.

संस्थेतील प्राध्यापकांचे अविरीत परिश्रम, औद्योगिक क्षेत्राशी संस्थेचा असलेला घनिष्ट संबंध व करार आणि सीईटीपी, महिला गारमेंट प्रशिक्षण, सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य याचा ‘एनबीए’ समितीने विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला. कॉलेजच्या अभ्यासक्रमांना ‘एनबीए’चा दर्जा प्राप्त झाल्याचे समजताच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंदेात्सव साजरा केला.

‘एनबीए मानांकन हे सर्वांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब असून, यामुळे संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरणा मिळाली आहे,’ अशी भावना माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी या वेळी व्यक्त केली.

या सर्व यशामध्ये संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी यांच्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, खजिनदार आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांसह सर्व विश्‍वस्त आणि संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर (प्रशासकीय) प्रा. डॉ. यू. जे. पाटील डे.डायरेक्टर (शैक्षणिक) प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search